TWS Earbuds: 21 तासांच्या बॅटरी लाईफसह Xiaomi TWS 3 Pro इयरबड्स येऊ शकतात भारतात; जाणून घ्या वैशिष्ट्ये
By सिद्धेश जाधव | Updated: November 25, 2021 17:51 IST2021-11-25T17:49:42+5:302021-11-25T17:51:18+5:30
TWS Earbuds: लवकरच कंपनी Xiaomi TWS 3 Pro देशात सादर करू शकते, जे 360-degree Spatial Audio, LHDC 4.0 आणि अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) सह सादर केले जातील.

TWS Earbuds: 21 तासांच्या बॅटरी लाईफसह Xiaomi TWS 3 Pro इयरबड्स येऊ शकतात भारतात; जाणून घ्या वैशिष्ट्ये
Xiaomi वायरलेस इयरफोन्सच्या सेगमेंटमध्ये गेल्या वर्षभरापासून शांत आहे. कंपनीने Mi True Wireless Earphones 2C नंतर भारतात कोणतेही इयरफोन्स सादर केले नाहीत. परंतु लवकरच कंपनी Xiaomi TWS 3 Pro देशात सादर करू शकते, अशी माहिती टिपस्टर मुकुल शर्माने दिली आहे. हे इयरबड्स 360-degree Spatial Audio सह LHDC 4.0 आणि अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) सारख्या फीचरसह बाजरात येतील.
टिपस्टरने या इयरबड्सच्या भारतीय लाँचची अचूक तारीख सांगितली नाही, परंतु यावर्षी डिसेंबर किंवा पुढील वर्षी जानेवारीमध्ये हे इयरफोन्स लाँच केले जाऊ शकतात. त्याचबरोबर नवीन स्पीकर देखील कंपनी बाजारात आणू शकते. TWS 3 Pro इयरबड्स याआधी चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत, त्यामुळे या इयरबड्सच्या स्पेक्सची माहिती मिळाली आहे.
Xiaomi TWS 3 Pro
शाओमीच्या या इयरबड्सची डिजाइन एयरपॉड्स प्रोसारखी आहे. या बड्समध्ये एयरपॉड्स प्रो चे 360-Degree डिग्री स्पेशियल ऑडियो फिचर देखील दिलं आहे. यात LHDC 4.0 टेक्नॉलॉजी मिळते, म्हणजे यात कमी लेटन्सीसह एचडी ऑडिओ मिळेल. हे इयरबड्स अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) फीचरसह येतात, जो बाहेरील आवाज 40dB पर्यंत कमी करतो. अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनमध्ये अॅबिएंट मोड, ह्यूमन व्हॉईस-एनहनसिंग मोड आणि थ्री-स्टेज नॉइज रिडक्शन मोड देण्यात आला आहे. ANC चा वापर न केल्यास TWS इयरबड्स 21 तास वापरता येतात. एएनसीचा वापर केल्यास बॅटरी लाईफ 6 तासांवर येते.