'या' रेडमी स्मार्टफोनसाठी श्याओमीकडून खास अपडेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 20:55 IST2018-09-21T20:52:59+5:302018-09-21T20:55:08+5:30
५.९९ इंची स्क्रीन, ४ जीबी रॅम, ६४ जीबी मेमरीच्या रेडमी नोट ५ प्रोमध्ये एलईडी फ्लॅशसोबत १२ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा आहे.

'या' रेडमी स्मार्टफोनसाठी श्याओमीकडून खास अपडेट
नवी दिल्लीः एकापेक्षा एक भारी फिचर्स आणि जबरदस्त कॅमेऱ्यामुळे मोबाइलप्रेमींकडून पसंतीची पावती मिळवलेला रेडमी नोट ५ प्रो आता आणखी हायटेक होतोय. श्याओमी कंपनी ५ प्रो युजर्ससाठी MIUI 10 स्टेबल ग्लोबल रोमचं 10.0.1.0.OEIMIFH हे व्हर्जन घेऊन आलीय. या अपडेटमुळे युजर्सना फुल स्क्रीन जेस्चर, अपडेट सिस्टम अॅप, नवं नोटिफिकेशन पॅनल, फुल स्क्रीन यूआय आणि नॅचर साउंड मिळणार आहे.
आपल्या फोनमध्ये Settings > About phone > System updates > Check for updates द्वारे रेडमी नोट ५ प्रो युजर्स या अपडेट्सची माहिती मिळवू शकतात. श्याओमीच्या सर्व्हरवर रिकव्हरी रोम आणि फास्टबूट रोमद्वारेही युजर्सना हे अपडेट मिळेल. अर्थात, आपला फोन अपडेट करण्याआधी बॅक-अप घ्यायला विसरू नका आणि फोन ८० ते ९० टक्के चार्ज ठेवायलाही विसरू नका.
५.९९ इंची स्क्रीन, ४ जीबी रॅम, ६४ जीबी मेमरीच्या रेडमी नोट ५ प्रोमध्ये एलईडी फ्लॅशसोबत १२ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा आहे, तर सेल्फीसाठी एलईडी फ्लॅशसोबत २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. ४००० mAh बॅटरी हे त्याचं आणखी एक वैशिष्ट्य. त्यामुळे या फोनवर अक्षरशः उड्या पडल्या होत्या.