पुन्हा वाढवली शाओमीने Redmi Note 10 स्मार्टफोनची किंमत; जाणून घ्या नवीन किंमत  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 07:16 PM2021-06-22T19:16:26+5:302021-06-22T19:22:43+5:30

Redmi Note 10 Price in India: Xiaomi Redmi Note 10 स्मार्टफोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 500 रुपयांनी वाढवली आहे.

Xiaomi redmi note 10 smartphone gets price hike in india  | पुन्हा वाढवली शाओमीने Redmi Note 10 स्मार्टफोनची किंमत; जाणून घ्या नवीन किंमत  

Redmi Note 10 मधील क्वाड रियर कॅमेरा सेटअपमध्ये प्राइमरी कॅमेरा 48-मेगापिक्सलचा आहे.

Next

Xiaomi ने लोकप्रिय Redmi Note 10 स्मार्टफोनची किंमत पुन्हा एकदा वाढवली आहे. विशेष म्हणजे कंपनीने एप्रिलच्या शेवटी या स्मार्टफोनची किंमत वाढवली होती. यावेळी कंपनीने Redmi Note 10 च्या 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत वाढवली आहे. एप्रिलमध्ये फोनच्या दोन्ही व्हेरिएंटची किंमत वाढवण्यात आली होती.  

Redmi Note 10 ची नवीन किंमत 

Xiaomi Redmi Note 10 स्मार्टफोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 500 रुपयांनी वाढवली आहे. 13,999 रुपयांमध्ये लाँच झालेला हा हा स्मार्टफोन दोनदा किंमत वाढल्यानंतर 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Redmi Note 10 चा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट सध्या 12,499 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.  

Redmi Note 10 चे स्पेसिफिकेशन्स 

Redmi Note 10 मध्ये 6.43-इंचाचा full-HD+ (1,080×2,400 पिक्सल) Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. शाओमीच्या या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 678 SoC मिळतो. या प्रोसेसरला 6GB पर्यंतच्या रॅम आणि 128GB पर्यंतच्या  स्टोरेजची जोड देण्यात आली आहे. या फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डने 512GB पर्यंत वाढवता येते. शाओमीचा हा फोन Android 11 वर आधारित MIUI 12 वर चालतो. 

Redmi Note 10 मधील क्वाड रियर कॅमेरा सेटअपमध्ये प्राइमरी कॅमेरा 48-मेगापिक्सलचा आहे. त्याचबरोबर 8-मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2-मेगापिक्सल डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. Redmi Note 10 स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.  

Web Title: Xiaomi redmi note 10 smartphone gets price hike in india 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app