शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

परवडणाऱ्या किंमतीत फ्लॅगशिप स्पेक्स देणाऱ्या Redmi K50 सीरीजची लाँच डेट आली समोर; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Published: December 04, 2021 5:16 PM

Redmi K50 Series: Redmi K50 Series मध्ये फ्लॅगशिप लेव्हल स्पेक्स असेलेले स्मार्टफोन सादर केले जाऊ शकतात. या स्मार्टफोन्सची किंमत मात्र अन्य फ्लॅगशिपपेक्षा कमी असेल.

Xiaomi आपल्या सब-ब्रँड Redmi च्या Redmi K सिरीजमध्ये फ्लॅगशिप स्पेसीफिकेशन असलेले स्मार्टफोन सादर करते. परंतु या फोन्सची किंमत अन्य फ्लॅगशिप पेक्षा कमी असते, हेच फोन्स भारतात POCO ब्रँड अंतर्गत सादर केले जातात. सध्या कंपनी Redmi K50 सीरीजवर काम करत आहे. आता टिपस्टर DigitalChatStation नं या सीरिजच्या लाँचची टाईमलाईन सांगितली आहे.  

रिपोर्टनुसार, Redmi K50 सीरीज पुढील वर्षी सादर केली जाऊ शकते. सर्वप्रथम हे फोन्स कंपनीच्या होम मार्केट अर्थात चीनमध्ये सादर केले जातील. तिथे ही सीरिज फेब्रुवारीमध्ये पदार्पण करू शकते. Redmi K50 सीरिजमध्ये चार स्मार्टफोन सादर केले जाऊ शकतात. यात Qualcomm Snapdragon 8 Gen 1, Snapdragon 870, MediaTek Dimensity 7000, आणि Dimensity 9000 चिपसेट असलेल्या फोन्सचा समावेश असेल.  

अलीकडेच भारतात आलेल्या Redmi Note 11T 5G चे स्पेसिफिकेशन्स       

Redmi Note 11T 5G स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं या स्मार्टफोनला MediaTek Dimensity 810 ची प्रोसेसिंग पॉवर दिली आहे. जो 2.4Ghz क्लॉक स्पीडला सपोर्ट करतो. सोबत कंपनीनं ग्राफिक्ससाठी माली जी57 जीपीयू दिला आहे. 

त्याचबरोबर 8GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात येईल. डिवाइसमध्ये व्हर्च्युअल रॅम फिचर दिला आहे. या फिचरच्या मदतीने अतिरिक्त 3GB रॅम वाढवता येतो. हा फोन अँड्रॉइड 11 ओएसवर आधारित मीयुआय 12.5 वर चालतो. 

रेडमी नोट 11टी स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यात 50MP चा प्रायमरी रियर कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा वाईड सेन्सर असलेला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडियो कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. 

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान