शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

ओरिजनलला 'डुप्लिकेट' भारी पडले; Xiaomi ने टाकले अ‍ॅपलला मागे

By हेमंत बावकर | Published: October 30, 2020 4:56 PM

Xiaomi Smartphone Market: यंदा जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान तिसऱ्या तिमाहीमध्ये 353.6 दशलक्ष स्मार्टफोन पाठविण्यात आले. आयडीसीने कोरोनामुळे 9 टक्क्यांची घट होईल असा अंदाज लावला होता. मात्र, अपेक्षेपेक्षा जास्त फोन पाठविण्यात आल्याने कोरोनाचा एवढा परिणाम झाला नसल्याचे म्हटले आहे. 

नवी दिल्ली : इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनन (IDC) ने यंदा तिसऱ्या तिमाहीमध्ये स्मार्टफोन शिपमेंटसंबंधीत रिपोर्ट जारी केला आहे. सॅमसंगने जगभरात डंका गाजवत पहिला क्रमांक कायम राखला आहे. तर शाओमीने (Xiaomi) अ‍ॅपलला मागे टाकून तिसरा क्रमांक पटकावला आहे. महत्वाचे म्हणजे शाओमीच्या मालकाने अ‍ॅपलच्या मालकाची यशोगाथा पाहून ही कंपनी सुरु केली होती. यानंतर अ‍ॅपलसारखेच दिसणारे परंतू अँड्रॉईडवर चालणारे स्मार्ट फोन लाँच केले होते. 

कोरोना संकट असले तरीही स्मार्टफोन पाठविण्यामध्ये फारसा फरक पडलेला नाही. या तिमाहीत 1.3 टक्के घट झाली आहे. कोरोना महामारीमुळे जगभरातील अनेक देशांमध्ये तीन ते चार महिने लॉकडाऊन पडले होते. तरीही हे आकडे खूप चांगले आहेत. 

यंदा जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान तिसऱ्या तिमाहीमध्ये 353.6 दशलक्ष स्मार्टफोन पाठविण्यात आले. आयडीसीने कोरोनामुळे 9 टक्क्यांची घट होईल असा अंदाज लावला होता. मात्र, अपेक्षेपेक्षा जास्त फोन पाठविण्यात आल्याने कोरोनाचा एवढा परिणाम झाला नसल्याचे म्हटले आहे. रिपोर्टनुसार सॅमसंग 22.7 टक्के स्मार्टफोन बाजारावर वर्चस्व ठेवून आहे. कंपनीने 2020 च्या तिसऱ्या तिमाहीत 80.4 दशलक्ष युनिट पाठविण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीने 2.9 टक्के जास्त युनिट बाजारात उपलब्ध केले होते. म्हणजे कोरोनाचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर 51.9 दशलक्ष युनिट विकत हुवावे ही चिनी कंपनी आहे. तिचे बाजारावर 14.7 टक्के वर्चस्व आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत शिपमेंटमध्ये 22 टक्क्यांची घट झाली आहे. 

दुसरीकडे तिसऱ्या नंबरवर चीनच्याच आणखी एका कंपनीने मजल मारली आहे. अ‍ॅपलसारख्या कंपनीला मागे टाकून शाओमीने 46.5 दशलक्ष युनिट बाजारात विकले आहेत. शाओमीने 13.1 टक्के बाजारावर कब्जा केला आहे. तसेच कमी किंमतीतील फोन आणत 42 टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. अ‍ॅपल आणि व्हिवोने अनुक्रमे 11.8 टक्के आणि 8.9 टक्के बाजारावर कब्जा केला आहे. महत्वाचे म्हणजे आयफोन 11 हा जगातील सर्वात जास्त खपाचा स्मार्टफोन होता. अ‍ॅपलने 41.6 दशलक्ष युनिट आणि व्हिवोने 31.5 दशलक्ष युनिट विकले आहेत. 

टॅग्स :xiaomiशाओमीApple Incअॅपलsamsungसॅमसंग