स्मार्ट पेन सपोर्टसह Xiaomi Mi Pad 5 सीरीज होणार सादर; 10 ऑगस्टचा मुहूर्त ठरला
By सिद्धेश जाधव | Updated: August 6, 2021 19:40 IST2021-08-06T19:40:32+5:302021-08-06T19:40:54+5:30
Xiaomi Mi Pad 5 Series launch: शाओमी लवकरच आपल्या टॅबलेट सीरीजमध्ये Mi Pad 5, Mi Pad 5 Pro आणि Mi Pad 5 Lite असे तीन टॅब सादर करू शकते.

स्मार्ट पेन सपोर्टसह Xiaomi Mi Pad 5 सीरीज होणार सादर; 10 ऑगस्टचा मुहूर्त ठरला
Xiaomi Mi Pad 5 सीरीज 10 ऑगस्टला चीनमध्ये लाँच होणार आहे. कंपनीने या लाँच इव्हेंटची माहिती चिनी सोशल नेटवर्क Weibo वरून दिली आहे. कंपनीने Mi Pad 5 चा एका फोटो स्टायलससह शेयर केला आहे. हा स्मार्ट पेन ब्लूटूथने टॅबशी कनेक्ट होईल. या स्टायलसला कंपीनीने Xiaomi Smart Pen असे नाव दिले आहे, हा स्मार्ट पेन FCC च्या लिस्टिंगमधून समोर आला होता.
Xiaomi च्या विबो पोस्टमध्ये एक लाँच पोस्टर शेयर करण्यात आला आहे, यातून टॅबलेट आणि स्टायलसची माहिती मिळाली आहे. शाओमीचा नवीन टॅबलेटमध्ये मेटल फ्रेम आणि गोलाकार एज मिळेल. शाओमीच्या स्मार्ट पेनची जास्त माहिती समोर आली नाही. फक्त हा पेन FCC वर M2107K81PC या मॉडेल नंबर आणि Bluetooth v5 LE सह दिसला होता.
Xiaomi Mi Pad 5 चे स्पेसिफिकेशन्स
प्रसिद्ध टिप्स्टर मुकुल शर्माने ट्विटरवर या टॅबलेटच्या रियर कॅमेऱ्याचा फोटो शेयर केला आहे. या फोटोनुसार या टॅबयामध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि फ्लॅश मॉड्यूल मिळेल. कॅमेरा मॉड्यूलवर AI Camera लिहिण्यात आले आहे. शाओमी या सीरीजमध्ये Mi Pad 5, Mi Pad 5 Pro आणि Mi Pad 5 Lite असे तीन टॅब लाँच करू शकते. टॅबलेटच्या लाइट व्हर्जनमध्ये स्नॅपड्रॅगन 860 प्रोसेसर आणि 10.95-इंचाचा 2K डिस्प्ले असेल. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz असू शकतो आणि यात 12MP चा मुख्य कॅमेरा मिळेल. या सीरीजमधील तिन्ही टॅबलेटमध्ये 2K रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले मिळेल. टॅबलेटचा प्रो व्हेरिएंट 5G सपोर्ट करेल.