12GB रॅमसह Xiaomi Mi MIX 4 वेबसाईटवर लिस्ट; लवकरच येऊ शकतो हा धमाकेदार स्मार्टफोन 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 03:55 PM2021-07-29T15:55:40+5:302021-07-29T15:57:35+5:30

Xiaomi Mi MIX 4 Launch: Xiaomi Mi MIX 4 फोन दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध लाँच होऊ शकतो, यात 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज अश्या दोन मॉडेल्सचा समावेश असेल.

Xiaomi mi mix 4 spotted at tenaa launch soon  | 12GB रॅमसह Xiaomi Mi MIX 4 वेबसाईटवर लिस्ट; लवकरच येऊ शकतो हा धमाकेदार स्मार्टफोन 

हा प्रतीकात्मक फोटो आहे.

googlenewsNext

Xiaomi आपल्या फ्लॅगशिप Mi Mix सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन Mi Mix 4 लाँच करण्याची तयारी करत आहे. गेले कित्येक दिवस या स्मार्टफोनची माहिती लिक्समधून येत आहे. हा फोन पुढल्या महिन्यात लाँच केला जाईल, अशी चर्चा आहे. या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सलचा अंडर-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर आणि ट्रिपल रियर कॅमेरा असे धमाकेदार फीचर्स मिळू शकतात. आता लाँच होण्यापूर्वी हा स्मार्टफोन चिनी सर्टिफिकेशन साइट टेनावर दिसला आहे.  

टेनावर Mi Mix 4 स्मार्टफोन मॉडेल नंबर M2016118C सह लिस्ट करण्यात आला आहे. हा Xiaomi फोन दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध लाँच होऊ शकतो, यात 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज अश्या दोन मॉडेल्सचा समावेश असेल. TENAA वर जरी उल्लेख केला गेला नसला तर Mi MIX 4 चा 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज असलेला अजून मोठा व्हेरिएंट बाजारात येण्याची शक्यता आहे.  

Xiaomi Mi MIX 4 संभाव्य स्पेसिफिकेशन्स  

Xiaomi Mi MIX 4 मध्ये 6.67-इंचाचा डिस्प्ले 1080P पिक्सल रिजोल्यूशनसह मिळू शकतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 888 Plus प्रोसेसर दिला जाऊ शकतो. यातील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये मुख्य कॅमेरा 50MP Samsung GN1s सेन्सर असेल. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 120W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह मिळू शकते. ही बॅटरी 70W किंवा 80W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते.  

Web Title: Xiaomi mi mix 4 spotted at tenaa launch soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.