शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

Xiaomi चा दसऱ्यादिवशीच धमाका! २०० मेगापिक्सलचा कॅमेरावाला स्मार्टफोन लाँच, दुसरा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 13:52 IST

भारत ही स्मार्टफोन कंपन्यांची मोठी बाजारपेठ आहे. दोन्ही फोनचे डिझाईन एकसारखेच आहे.

Xiaomi ने आपला नवा प्रिमिअम फोन लाँच केला आहे. Xiaomi 12T आणि Xiaomi 12T Pro अशी या दोन्ही फोनची नावे असून महत्वाचे म्हणजे एकामध्ये २०० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन सध्या ग्लोबल मार्केटमध्ये उपलब्ध केला जाणार आहे. भारतात हा फोन कधी लाँच होईल याची माहिती मिळालेली नाही. 

भारत ही स्मार्टफोन कंपन्यांची मोठी बाजारपेठ आहे. Xiaomi 12T ची किंमत 599 यूरो म्हणजेच ४८ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. ही बेस व्हेरिअंटची किंमत आहे. बेस व्हेरिअंटमध्ये 8GB रॅम सोबत 128GB ची इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. Xiaomi 12T Pro ची किंमत 749 यूरो म्हणजे 60,500 रुपये ठेवण्यात आली आहे. दोन्ही स्मार्टफोन ब्लॅक, ब्ल्यू आणि सिल्ह्वर रंगात उपलब्ध केले जाणार आहेत. 

दोन्ही फोनचे डिझाईन एकसारखेच आहे. मात्र, स्पेसिफिकेशनमध्ये थोडे अंतर आहे. Xiaomi 12T मध्ये  MediaTek Dimensity 8100-Ultra चिपसेट देण्यात आले आहे. तर प्रो व्हेरिअंटमध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.7-इंचाची टचस्क्रीन 2712x1220 पिक्सल रिझोल्यूशनची देण्यात आली आहे. यामध्ये रिफ्रेश रेट 120Hz  असून कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन देण्यात आला आहे. दोन्ही फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये 120W वायर्ड चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन १९ मिनिटांत फुल चार्ज होणार आहे. 

प्रोमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील प्रायमरी सेन्सर हा २०० मेगापिक्सलचा आहे. तसेच ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड आणि एक २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर देण्यात आला आहे. तर 12T मध्ये 108-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. दोन्ही फोनमध्ये 20-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 

टॅग्स :xiaomiशाओमी