शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

ऑल राऊंडर Xiaomi 11T सीरीजच्या भारतीय लाँचसाठी उरले फक्त काही दिवस; लीकमधून समोर आली माहिती  

By सिद्धेश जाधव | Published: September 20, 2021 7:11 PM

Xiaomi 11T Price in India: प्रसिद्ध टिप्स्टरने ट्विटरवरून Xiaomi 11T सीरीजच्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे.  

गेल्याच आठवड्यात शाओमीने जागतिक बाजारात Xiaomi 11T, Xiaomi 11T Pro आणि Xiaomi 11 Lite NE 5G स्मार्टफोन असे तीन स्मार्टफोन आणि Xiaomi Pad 5 टॅबलेट सादर केला होता. यातील Xiaomi 11 Lite NE 5G स्मार्टफोन 29 सप्टेंबरला भारतात सादर केला जाईल, असे कंपनीने सांगितले आहे. परंतु फ्लॅगशिप 11T देशात कधी येईल हे मात्र कंपनीने अधिकृतरीत्या सांगितले नाही. प्रसिद्ध टिप्स्टर मुकुल शर्माने ट्विटरवर Xiaomi 11T सीरीज ऑक्टोबरमध्ये भारतात येणार असल्याचे सांगितले आहे. या सीरिजमधील दोन्ही किंवा प्रो व्हेरिएंट ग्राहकांच्या भेटीला येईल.  

Xiaomi 11T चे स्पेसिफिकेशन्स   

Xiaomi 11T मधील डिस्प्लेवर कंपनीने खूप काम केल्याचे दिसते. यातील 6.67-इंचाचा FHD+ TrueColour डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, 480Hz टच रिस्पॉन्स रेट, आयकेयर मोड, 20:9 अस्पेक्ट रेश्यो आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास Victus लेयर प्रोटेक्शनसह सादर करण्यात आला आहे. या 5G फोनमध्ये MediaTek Dimensity 1200 Ultra चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8GB RAM आणि 256GB ची इंटरनल स्टोरेज मिळते. फोन Android 11 OS सह MIUI 12.5 कस्टम स्किनवर चालतो.   

Xiaomi 11T मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपची खासियत यातील 108MP चा मुख्य सेन्सर आहे. ज्याला 120-डिग्री FoV असलेल्या 8MP च्या अल्ट्रा-वाईड-अँगल कॅमेरा आणि 3x झूम देणाऱ्या टेली-मॅक्रो कॅमेऱ्याची जोड देण्यात आली आहे. यात सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. तसेच पॉवर बॅकअपसाठी Xiaomi 11T मध्ये 4,500mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.   

Xiaomi 11T Pro चे स्पेसिफिकेशन्स  

नावावरून समजले असेल कि Xiaomi 11T Pro या सीरिजमधील पॉवरफुल फोन आहे. स्पेसिफिकेशन्समधून देखील ही पॉवर दिसून येते. कारण या फोनमध्ये क्वॉलकॉमचा शक्तिशाली Snapdragon 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड MIUI 12.5 वर चालतो. शाओमी 11T मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 20:9 अस्पेक्ट रेश्यो, 480Hz टच रिस्पॉन्स रेट, डॉल्बी विजन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस लेयरसह 6.67-इंचाचा FHD+ TrueColor डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 12GB रॅम आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते आहे.   

या फोनची खासियत म्हणजे या फोनचा चार्जिंग स्पीड. Xiaomi 11T Pro मधील 5000mAh ची बॅटरी 120W इतक्या जबरदस्त वेगाने चार्ज करता येते. हा फोन फक्त 17 मिनिटांत फुलचार्ज होऊ शकतो. बेस मॉडेलप्रमाणे या फोन मध्ये देखील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 108MP चा सॅमसंग HM2 मुख्य सेन्सर, 8MP ची 119-डिग्री अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स आणि 3x झूमसह 8MP टेलीमॅक्रो सेन्सर आहे. हा 16MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.   

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड