शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

6,500 रुपयांच्या डिस्काउंटसह 17 मिनिटांत फुल चार्ज होणारा Xiaomi चा 5G Phone उपलब्ध; 108MP चा कॅमेरा काढतो झक्कास फोटो 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2022 6:33 PM

Xiaomi 11T Pro 5G Phone: Xiaomi 11T Pro 5G हा स्मार्टफोन 108MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 12GB RAM आणि 120W च्या वेगवान फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

Xiaomi नं काही दिवसांपूर्वी भारतात आपला एक प्रीमियम 5G Phone सादर केला आहे. हा स्मार्टफोन 108MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 12GB RAM आणि 120W च्या वेगवान फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. कंपनीनं हा फोन Xiaomi 11T Pro 5G नावानं बाजारात उतरवला होता. आता हा फोन कंपनीच्या वेबसाईटवर स्वस्तात विकत घेण्याची संधी मिळत आहे.  

Xiaomi 11T Pro 5G ची किंमत आणि ऑफर्स 

Xiaomi 11T Pro 5G स्मार्टफोनचा 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे. परंतु या स्मार्टफोनच्या खरेदीवर सिटी बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना 3 हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे. सोबत एक्सचेंजवर 3 हजार रुपयांचा अडिशनल डिस्काउंट दिला जात आहे. तुम्हाला 500 रुपयांचे Rewards Mi कुपन देखील मिळतील. तसेच मोबिक्विकनं पेमेंट केल्यास 600 रुपयांची बचत देखील होईल. तसेच Mi Exchange अंतगर्त 21,600 रुपये पर्यंतचा फायदा देखील मिळत आहे.  

Xiaomi 11T Pro चे स्पेसिफिकेशन्स

Xiaomi 11T Pro मध्ये क्वॉलकॉमचा शक्तिशाली Snapdragon 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड MIUI 12.5 वर चालतो. शाओमी 11T मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 20:9 अस्पेक्ट रेश्यो, 480Hz टच रिस्पॉन्स रेट, डॉल्बी विजन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस लेयरसह 6.67-इंचाचा FHD+ TrueColor डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 12GB रॅम आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते आहे.   

या फोनची खासियत म्हणजे या फोनचा चार्जिंग स्पीड. Xiaomi 11T Pro मधील 5000mAh ची बॅटरी 120W इतक्या जबरदस्त वेगाने चार्ज करता येते. हा फोन फक्त 17 मिनिटांत फुलचार्ज होऊ शकतो. फोनमध्ये देखील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 108MP चा सॅमसंग HM2 मुख्य सेन्सर, 8MP ची 119-डिग्री अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स आणि 3x झूमसह 8MP टेलीमॅक्रो सेन्सर आहे. हा 16MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.  

कनेक्टिव्हिटीसाठी यात 5जी, 4जी एलटीई, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळतो. सोबत या फोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉससह ड्युअल हार्मन कार्डन स्पिकर देण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी एक साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे.   

हे देखील वाचा:

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान