शाओमीचा दमदार 5G फोन 29 सप्टेंबरला येणार भारतीयांच्या भेटीला; लाँच पूर्वी जाणून घ्या वैशिष्ट्ये  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 07:20 PM2021-09-16T19:20:11+5:302021-09-16T19:23:25+5:30

Xiaomi 11 Lite 5G Price in India: शाओमीने अधिकृतपणे माहिती दिली आहे कि, हा नवीन 5G फोन 29 सप्टेंबरला भारतीय बाजारात लाँच केला जाईल. कंपनीने ग्लोबल लाँच नंतर काही तासांत देशातील लाँचची माहिती दिली आहे.

Xiaomi 11 lite new 5g launch in india 29 september sale amazon india price  | शाओमीचा दमदार 5G फोन 29 सप्टेंबरला येणार भारतीयांच्या भेटीला; लाँच पूर्वी जाणून घ्या वैशिष्ट्ये  

शाओमीचा दमदार 5G फोन 29 सप्टेंबरला येणार भारतीयांच्या भेटीला; लाँच पूर्वी जाणून घ्या वैशिष्ट्ये  

Next

काल शाओमीने आपल्या ग्लोबल लाँच इव्हेंटच्या माध्यमातून Xiaomi 11 Lite 5G NE स्मार्टफोन सादर केला आहे. तर आज शाओमी इंडियाने या स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची तारीख सांगितलंय आहे. शाओमीने अधिकृतपणे माहिती दिली आहे कि, हा नवीन 5G फोन 29 सप्टेंबरला भारतीय बाजारात लाँच केला जाईल. कंपनीने ग्लोबल लाँच नंतर काही तासांत देशातील लाँचची माहिती दिली आहे. शाओमी ब्रॅंडिंगसह भारतात सादर होणारा हा पहिला फोन असू शकतो.  

Xiaomi 11 Lite 5G NE चे स्पेसिफिकेशन्स   

Xiaomi 11 Lite 5G NE मध्ये कंपनीने क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778G चिपसेटचा वापर केला आहे. हा एक 5G प्रोसेसर आहे. तसेच फोनमध्ये 8GB पर्यंतचा रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येते. या फोनमध्ये MIUI 12.5 ही कंपनीची कस्टम स्किन देण्यात आली आहे, जी Android 11 वर आधारित आहे. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. Xiaomi 11 Lite 5G NE नावाप्रमाणे पातळ आणि हलका फोन आहे, ज्याची जाडी 6.81mm आणि वजन फक्त 158 ग्राम आहे.   

या फोनमध्ये 6.55-इंचाचा FHD+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. डॉट नॉच डिजाईनसह येणारा हा फोन 2400×1080 पिक्सल रिजोल्यूशन, डॉल्बी व्हिजन, HDR10+ आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी Xiaomi 11 Lite 5G NE च्या बॅक पॅनलवर तीन कॅमेरे असलेला सेटअप मिळतो. ज्यात 64MP चा मुख्य कॅमेरा, 8MP ची वाईड-अँगल लेन्स आणि 5MP चा टेलीमॅक्रो कॅमेरा आहे. फ्रंट पॅनलवरील 20MP चा कॅमेरा सेल्फी आणि व्हिडीओ कॉल करण्याच्या कामी येतो. पॉवर बॅकअपसाठी या डिवाइसमध्ये 4,250mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.   

Xiaomi 11 Lite 5G NE ची किंमत   

जागतिक बाजारात Xiaomi 11 Lite 5G NE चे दोन व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत. या फोनचा 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज असलेला मॉडेल EUR 369 (जवळपास 32,000 रुपये) आणि 8GB RAM व्हेरिएंटची किंमत EUR 399 (जवळपास 34,600 रुपये) आहे. 91मोबाईल्सने हा फोन भारतात 23 ते 24 हजार रुपयांच्या आत उपलब्ध होईल असे सांगितले आहे.   

Web Title: Xiaomi 11 lite new 5g launch in india 29 september sale amazon india price 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app