फेक न्यूजवर बसणार आळा; X ने भारतात लॉन्च केले Community Notes फिचर, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 04:04 PM2024-04-04T16:04:55+5:302024-04-04T16:06:39+5:30

X (Twitter) ने आजपासून भारतात Community Notes फिचर सुरू केले आहे.

X launches Community Notes feature in India | फेक न्यूजवर बसणार आळा; X ने भारतात लॉन्च केले Community Notes फिचर, जाणून घ्या...

फेक न्यूजवर बसणार आळा; X ने भारतात लॉन्च केले Community Notes फिचर, जाणून घ्या...

Twitter Communiti Notes Feature: मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट X (पूर्वीचे Twitter) ने भारतात कम्युनिटी नोट्स (Community Notes) फिचर सुरू केले आहे. खुद्द Xचे मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ही माहिती दिली. या फिरमध्ये युजरला X वर कम्युनिटी पोस्ट लिहिण्याची आणि रेट करण्याची सुविधा मिळते. भारतापूर्वी हे फीचर डिसेंबर 2022 मध्येच जागतिक स्तरावर रिलीज करण्यात आले होते. मात्र, आता ते भारतात लॉन्च करण्यात आले आहे.

ट्विटरने हे फिचर फॅक्ट चेकिंग प्रोग्राम अंतर्गत आणले आहे. लोकसभा निवडणुकीच्याच्या पार्श्वभूमीवर हे फिचर आल्याने त्याला जास्त महत्व मिळाले आहे. निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावर अनेकदा फेक न्यूज व्हायरल होतात. ट्विटरवर अशा खोट्या बातम्या पसरू नयेत, यासाठीच हे कम्युनिटी नोट्स फिचर सुरू करण्यात आले आहे. इलॉन मस्क यांनी स्वतः त्यांच्या अधिकृत X (ट्विटर) हँडलद्वारे हे फिचर भारतात लॉन्च झाल्याची माहिती दिली. यासोबतच मस्क यांनी सांगितले की, भारतासोबतच आता 69 देशांमध्ये कम्युनिटी नोट्स फिचर उपलब्ध असेल.

कम्युनिटी नोट्सद्वारे फेक न्यूजला आळा घालणार
भारतातील कॉट्रीब्यूटर्स आज (गुरुवार) पासून कम्युनिटी नोट्स जॉईन करु शकतील. याद्वारे भारतीय युजर्सना  प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या पोस्टच्या फॅक्ट चेंकिंगमध्ये भाग घेता येईल. याद्वारे ट्विटर युजर्सना योग्य माहिती पुरवली जाईल. X ने विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना नोट्स ऑर्थर म्हणून योगदान देण्यासाठी आमंत्रित केले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी X ने कम्युनिटी नोट्स पोस्ट करणे सुरू केल्यामुळे चुकीच्या बातम्या पसरण्यापासून रोखता येतील.

Community Notesमध्ये कसे सामील व्हावे
1. X च्या Community Notes फिचरमध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला (https://twitter.com/i/flow/join-birdwatch) वर जावे लागेल.
2. यानंतर Join Community Notes वर क्लिक करा.
3. आता तुमच्यासमोर काही अटी असतील, त्या पूर्ण केल्यानंतर तुम्ही कम्युनिटी नोट्स फीचर वापरू शकता.
4. सर्व अटी पूर्ण केल्यानंतर, Got it वर क्लिक करा.
5. यानंतर तुम्ही कम्युनिटी नोट कोणत्याही पोस्टसह शेअर करू शकता.

Web Title: X launches Community Notes feature in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.