The world's largest radio telescope launched in China; size like 30 Football Ground | जगातील सर्वात मोठा रेडिओ टेलिस्कोप सुरू; आकार पाहून डोळेच विस्फारतील

जगातील सर्वात मोठा रेडिओ टेलिस्कोप सुरू; आकार पाहून डोळेच विस्फारतील

बिजिंग : चीनमध्ये जगातील सर्वांत मोठा आणि संवेदनशील रेडिओ टेलिस्कोप सुरू करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे या टेलिस्कोपची चाचणीच तीन वर्षे घेण्यात येत होती. तर हा टेलिस्कोप बनविण्यासाठी चीनला तब्बल 20 वर्षे लागली. हा टेलिस्कोप जगभरातील खगोल शास्त्रज्ञांसाठी खुला करण्यात आला आहे. 


चीनमध्ये एवढी प्रगत टेक्नॉलॉजी आहे की, हजारो किमी लांबीचे रस्ते आणि गगनचुंबी इमारती बांधण्यासाठी काही महिनेच लागतात. मात्र, या टेलिस्कोप निर्मितीच्या कामाने चीनला मोठा वेळ खर्ची घालावा लागला आहे. हा टेलिस्कोप गुईझोऊ प्रांतामध्ये बांधण्यात आला आहे. 2016 पासून याची चाचणीच घेण्यात येत होती. 


हा टेलिस्कोप प्युर्टोरिकाच्या अरेसिबो ऑब्झर्व्हेटरीपेक्षा 2.5 पटींनी संवेदनशील आहे. प्युर्टोरिकास्थित ऑब्झर्व्हेटरीमध्ये जगातील दुसरा मोठा सिंगल डिश रेडिओ टेलिस्कोप कार्यरत आहे. याचा वापर अंतराळात दूरवर जीवजंतूंचा शोध आणि एलियन्सचा शोध घेण्यासाठी करण्याच येतो. चीनचा टेलिस्कोप एका सेकंदात 28 जीबी माहिती गोळा करण्यात सक्षम आहे. यामुळे त्याला फाईव्ह हंड्रेड मीटर अपार्चर स्पेरिकल रेडिओ टेलिस्कोप (फास्ट) असे नाव देण्यात आले आहे. फास्टची अंतराळातील रेंज चार पटींनी जास्त आहे. 


टेलिस्कोपने आतापर्यंत जवळपास 44 पल्सरचा शोध लावला आहे. पल्सर हा वेगाने फिरणारा न्यूट्रॉन किंवा तारा असतो, जो रेडिओ लहरी आणि विद्युत चुंबकीय विकिरण उत्सर्जित करतो. या टेलिस्कोपच्या पाच किमीच्या परिघामध्ये कोणतेही शहर नाही. 

Web Title: The world's largest radio telescope launched in China; size like 30 Football Ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.