World Emoji Day : 'या' इमोजींचा भारतात होतो सर्वाधिक वापर!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 12:16 PM2018-07-17T12:16:34+5:302018-07-17T12:21:14+5:30

आज वर्ल्ड इमोजी डे... आपण सोशल मीडिया साईट्सवर मेसेज टाईप करून पाठवण्यापेक्षा बऱ्याचदा इमोजीचा वापर करून आपल्या भावना व्यक्त करतो. सध्याचे युग सोशल मीडियाचे युग आहे.

world emoji day find out which emoji indians use the most | World Emoji Day : 'या' इमोजींचा भारतात होतो सर्वाधिक वापर!

World Emoji Day : 'या' इमोजींचा भारतात होतो सर्वाधिक वापर!

Next

आज वर्ल्ड इमोजी डे... आपण सोशल मीडिया साईट्सवर मेसेज टाईप करून पाठवण्यापेक्षा बऱ्याचदा इमोजीचा वापर करून आपल्या भावना व्यक्त करतो. सध्याचे युग सोशल मीडियाचे युग आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे सोशल मीडिया साईट्स आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत त्याचप्रमाणे इमोजीही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहेत. त्यामुळे 17 जुलै हा दिवस वर्ल्ड इमोजी डे म्हणून साजरा करण्यात येतो. 2014 पासून वर्ल्ड इमोजी डे साजरा करण्यास सुरुवात झाली. याचदरम्यान जेरेमी बर्ज यांनी इमोजीपिडीया म्हणजेच इमोजींची विकिपीडिया तयार केली होती. 

काही लोकांसाठी इमोजी म्हणजे आपल्या भावना व्यक्त करण्याचे माध्यम आहे तर काही लोकांचा असा समज आहे की, इमोजीमुळे भाषेचा वापर फार कमी होतो. त्यामुळे इमोजीच्या अधिक वापरामुळे भाषा लोप पावण्याचा धोकाही संभवतो. 

भारतात कोट्यावधी लोकं सोशल मीडियाचा वापर संवाद साधण्यासाठी करतात. ते विविध भाषांमध्ये संवाद साधण्यासोबतच अनेक इमोजींचाही वापर करतात. ट्विटरबाबत बोलायचं झालं तर भारतीय हसताहसता डोळ्यात पाणी येणाऱ्या इमोजीचा सर्वाधिक वापर करतात. त्यानंतर हसणाऱ्या चेहऱ्याचा इमोजी आणि त्यापाठोपाठ हात जोडणाऱ्या इमोजीचा सर्वाधिक वापर करण्यात येतो. 

इमोजीचा सर्वात आधी वापर 1995मध्ये करण्यात आला होता. यादरम्यान लोकं संवाद साधण्यासाठी पेजर्स वापरत असत. एका जपानी कंपनीने तयार केलेल्या या पेजर्समध्ये त्यांनी एक हार्ट आयकॉनचा वापर केला होता. हे आयकॉन लगेचच जापानच्या तरूणाईमध्ये लोकप्रिय झालं होतं.  

मागील काही वर्षांत इमोजींचा वापर खूप झपाट्याने वाढला आहे. फेसबुकवर हार्टचे इमोजी मागील वर्षाच्या तुलनेत अधिक वापरला जात आहे. आता सध्या इंटरनेटवर 2,800 इमोजी उपलब्ध असून दररोज जवळपास 2300 इमोजी वापरण्यात येत आहेत. दररोज फेसबुकवर 6 कोटी इमोजींचा वापर करण्यात येतो. जगभरामध्ये इमोजींचा सर्वात जास्त वापर नवीन वर्षाच्या रात्री करण्यात येतो.

Web Title: world emoji day find out which emoji indians use the most

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.