शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सारांश: महिलाही ‘इंटरनेट’च्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 10:01 IST

मेरा देश बदल रहा है! सध्या देशातील शहरी भागांसह गाव-खेड्यांमध्येही इंटरनेटच्या सक्रिय वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

सागर सिरसाट, उपसंपादक, मुंबई

मेरा देश बदल रहा है! सध्या देशातील शहरी भागांसह गाव-खेड्यांमध्येही इंटरनेटच्या सक्रिय वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे आता तर सक्रिय इंटरनेट वापरकर्त्यांच्या बाबतीत ग्रामीण भागाने शहरांवरही मात केली आहे. शिवाय, गेल्या दोन वर्षांत इंटरनेट वापरणाऱ्या महिलांच्या संख्येतही कमालीची वाढ झाली असून महिलांनी याबाबतीत पुरुषांना मागे टाकले आहे. एका डेटा आणि मार्केट रिसर्च फर्मने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

दोन वर्षांत इंटरनेट वापरणाऱ्या महिलांच्या संख्येत ६१ टक्क्यांची वाढ, तर पुरुषांची संख्या या काळात केवळ २४ टक्क्यांनी वाढली. खेड्यांमधील ३ पैकी १ महिला सक्रियपणे इंटरनेटचा वापर करते. देशभरात २ वर्षांवरील सक्रिय इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या डिसेंबर २०२१ पर्यंत ६४ काेटी ६० लाखखेड्यांमध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या शहरांच्या तुलनेत २० टक्क्यांनी जास्त ग्रामीण भागात ३५ काेटी २० लाख इंटरनेट वापरकर्ते शहरी भागात सक्रिय इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या २९ काेटी ४० लाख

कारण काय?

परवडणारे स्मार्टफोन आणि परवडणारा मोबाईल डेटा उपलब्ध करून डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे इंटरनेटचा वापर वाढला आहे. डेटाची किंमत सर्वात कमी असलेल्या देशांच्या शीर्ष यादीमध्ये आपला देश समाविष्ट आहे, त्यामुळे इंटरनेटचा वापरदेखील वाढलाय. या सर्वेक्षणामुळे ग्रामीण भारताचीही तंत्रज्ञानाचा अधिक वेगाने वापर करण्याची इच्छा असल्याचे स्पष्टपणे दिसते. 2019 च्या तुलनेत खेड्यांमध्ये इंटरनेट वापरात 45 टक्के वाढ झाली आहे. तर शहरांमध्ये केवळ 28 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. 

टॅग्स :Internetइंटरनेट