२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 18:58 IST2025-12-08T18:57:20+5:302025-12-08T18:58:05+5:30
२०२५ मध्ये गुगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या शब्दांपैकी एक ७-अंकी नंबर होता तो म्हणजे ५२०१३१४.

२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
इंटरनेटच्या युगात दररोज नवीन शब्द आणि ट्रेंड उदयास येतात, त्यापैकी काही खूपच वेगळे आणि मनोरंजक आहेत. २०२५ मध्ये गुगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या शब्दांपैकी एक ७-अंकी नंबर होता तो म्हणजे ५२०१३१४.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे "Stampede" आणि "Mayday" सारख्या गंभीर शब्दांमध्येही हा नंबर गुगलच्या टॉप सर्च लिस्टमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. म्हणूनच इंटरनेटशी आणि विशेषतः रिलेशनशिप ट्रेंड्स माहित नसलेल्या लोकांसाठी हा नंबर म्हणजे एक रहस्य आहे.
दरवर्षी, गुगल त्यांचे Year in Search फीचर जारी करतं, जे वर्षभरात सर्वाधिक शोधले जाणारे शब्द सांगतं. यामध्ये ट्रेंडिंग न्यूज, पॉप कल्चर, टेक्नॉलॉजी आणि सामान्य लोकांच्या आवडीचे विषय समाविष्ट आहेत.
२०२५ मध्ये युद्ध, तणाव, सीजफायर आणि मॉक ड्रिलसारखे शब्द मोठ्या प्रमाणात शोधले जात असताना, प्रेम आणि भावनांशी संबंधित ५२०१३१४ या नंबरचा अर्थ जाणून घेण्यातही लोकांनी खूप रस दाखवला.
५२०१३१४ म्हणजे काय?
गुगलवरचा ट्रेंडिंग नंबर ५२०१३१४ हा एक चिनी इंटरनेट स्लँग आहे. या ७-अंकी नंबरचा अर्थ "मी आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करतो किंवा करते." याचाच अर्थ तो फक्त एक नंबर नाही तर प्रेमाची डिजिटल भाषा आहे.
हा ट्रेंड सोशल मीडियाद्वारे भारतातही पोहोचला, विशेषतः तरुणांमध्ये. आजच्या युगात, ग्लोबल स्लँग आणि ट्रेंडचा वेगाने प्रसार झाल्यामुळे हा चिनी नंबर भारतातही जोरदार व्हायरल होत आहे.
नंबरद्वारे प्रेम व्यक्त करणं हा नवीन ट्रेंड नाही. भारतात, "१२३ = आय लव्ह यू" हा ट्रेंड तरुणांमध्ये आधीच खूप लोकप्रिय आहे. त्याचप्रमाणे, ५२०१३१४ हा देखील डिजिटल लव्ह कल्चरचा एक भाग बनला आहे, जिथे भावना व्यक्त करण्यासाठी नंबरने शब्दांची जागा घेतली आहे.
हा स्लँग पूर्वी चीनपुरता मर्यादित होता, परंतु सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे तो आता जगभर पसरला आहे. भारतातही रिलेशनशिप स्टेटस, रील्स आणि चॅटमध्ये या नंबरचा वापर झपाट्याने वाढला आहे. सध्या त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.