शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
2
आता सभा घेऊन कोणाचे पोर कडेवर खेळवणार? अनिल परबांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण
3
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
4
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
5
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
6
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
7
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
8
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
9
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
10
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
11
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
12
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
13
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
14
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
15
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
16
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
17
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
18
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
19
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
20
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'

अलर्ट! चीनी अ‍ॅपचा वापर करताय?; बसू शकतो मोठा फटका, जाणून घ्या धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 2:40 PM

TikTok पासून UC ब्राऊझर, हॅलो अ‍ॅपपर्यंत सर्व चीनी अ‍ॅप्स भारतात खूप लोकप्रिय आहेत. मात्र या अ‍ॅप्सचा वापर करणं अत्यंत धोकादायक असल्याची माहिती आता समोर आली आहे.

नवी दिल्ली - भारत आणि चीनदरम्यान असलेला तणाव वाढत आहे.  सीमेवरील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले. देशभरात चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अनेकांनी तर आपल्या फोनमधून चीनी अ‍ॅप्स देखील हटवून याची सुरुवात केली आहे. TikTok पासून UC ब्राऊझर, हॅलो अ‍ॅपपर्यंत सर्व चीनी अ‍ॅप्स भारतात खूप लोकप्रिय आहेत. मात्र या अ‍ॅप्सचा वापर करणं अत्यंत धोकादायक असल्याची माहिती आता समोर आली आहे. तुमच्या फोनमध्ये असे अ‍ॅप्स असल्यास काय होऊ शकतं ते जाणून घेऊया.

चीनी अ‍ॅप युजर्सना धोका पोहचवू शकतात. एका इनफॉर्मेशन सिक्यॉरिटी फर्मने केलेल्या रिसर्चमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे. Helo, Shareit आणि UC ब्राऊझर यासारखे 10 पैकी 6 लोकप्रिय चीनी अ‍ॅप्स युजर्सकडे कॅमेरा आणि मायक्रोफोनचा अ‍ॅक्सेस मागतात. मात्र या अ‍ॅप्समध्ये या अ‍ॅक्सेसचे कोणतेही काम नसते. पुण्याच्या Arrka Consulting चे सह संस्थापक संदीप रावने यांनी हे जगभरातील टॉप 50 अ‍ॅप्सकडून मागितलेल्या परमिनशनपेक्षा 45 टक्के जास्त असल्याचं म्हटलं आहे. 

काही चीनी अ‍ॅप्स अनेकदा लोकेशनचा अ‍ॅक्सेस मागतात. Arrka Consulting च्या सह संस्थापक शिवांगी नाडकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यूसी ब्राऊझर लोकेशनचा अ‍ॅक्सेस मागतं. ही व्यक्ती कुठून माहिती सर्च करतेय याची माहिती मिळवता यावी यासाठी कंपनी हे करतं. यासारखे अ‍ॅक्सेस हा फूड डिलिव्हरी देणाऱ्या अ‍ॅप्ससाठी गरजेचा आहे.  अ‍ॅप्स युजर्संचा डेटा सात विदेशी एजन्सीला ट्रान्सफर करते. 

रिपोर्टनुसार, टिकटॉक आपला डेटा चायना टेलिकॉमला पाठवतो. तर विगो व्हिडिओ आपला डेटा Tencent, ब्यूटीप्लस आपला डेटा Meitu आणि QQ व UC ब्राउजरला डेटा Alibaba पर्यंत पोहोचवतो. चीनी अ‍ॅप्सवर हेरगिरी आणि धोका करीत असल्याचा आरोप करण्यात आलेले आहेत.2017 मध्ये भारतीय इंटेलिजन्स एजन्सीने अशा 42 मोबाइल अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर न करण्याचा सल्ला दिला होता. जे चीनी डेव्हलपर्सने तयार केलेला आहे. किंवा चीन संबंधी त्यात लिंक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

तब्बल 21 महिने झाले तरी वडिलांनी केले नाहीत मुलावर अंत्यसंस्कार; 'हे' आहे कारण 

CoronaVirus News : अरे व्वा! साडी खरेदीवर महिलांना मिळतंय खास 'कोरोना कवच'; जाणून घ्या 'हे' नेमकं आहे तरी काय? 

CoronaVirus News : 'त्याच्या' जिद्दीला सलाम! आईचं औषध अन् भावंडांच्या शिक्षणासाठी उचलतोय कोरोनाग्रस्तांचे मृतदेह

Today's Fuel Price : इंधन दरवाढीचा भडका! सलग बाराव्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले

CoronaVirus News : बापरे! 'या' व्यक्तींसाठी कोरोना ठरतोय जीवघेणा; 12 पट अधिक आहे मृत्यूचा धोका

टॅग्स :Mobileमोबाइलchinaचीनtechnologyतंत्रज्ञानTik Tok Appटिक-टॉक