कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 10:44 IST2025-08-11T10:43:52+5:302025-08-11T10:44:06+5:30
F आणि J या बटनांवर खाली ही आडवी रेष मारलेली असते. जी हाताला लागावी अशी या बटणावरच दिलेली असते. ही एक निशाणी म्हणून काम करते.

कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
अनेकांना कॉम्प्युटरच्या कीबोर्डवर किती बटण असतात याचा आता आकडा आठवत नसेल. हा आकडा होता १०४. आता या पैकी दोन बटण अशी आहेत ज्यावर आडवी रेष असते. तुम्ही कधी पाहिली असेल किंवा नाही माहिती नाही. परंतू F आणि J या बटनांवर खाली ही आडवी रेष मारलेली असते. जी हाताला लागावी अशी या बटणावरच दिलेली असते. ही एक निशाणी म्हणून काम करते.
या खुणा टॅक्टाइल गाईड्स म्हणतात. त्यांचे काम कीबोर्डकडे न पाहता टाइप करताना तुमची बोटे योग्य ठिकाणी ठेवण्यास मदत करणे आहे. ५ या आकड्यावरही अशी खुण असते. आता तु्म्हाला सराव झालेला असेल. यामुळे तुमची बोटे कीबोर्डकडे न पाहता देखील सरावलेली आहेत. परंतू, या बोटांना नकळत या लाईन मदत करत असतात.
QWERTY कीबोर्ड लेआउटमध्ये, डाव्या हाताची तर्जनी 'F' वर आणि उजव्या हाताची तर्जनी 'J' वर ठेवली जाते. उर्वरित बोटे त्यांच्या संबंधित मुख्य पंक्तीच्या बटणांवर ठेवली जातात. डाव्या हाताची बोटे A-S-D-F आणि उजव्या हाताची बोटे J-K-L अशा रितीने ठेवली जातात.
यामुळे तुम्ही थेट स्क्रीनवर लक्ष केंद्रित करू शकता व फास्ट टायपिंग करू शकता. बोटे सतत योग्य ठिकाणी ठेवल्याने मेंदू आणि हाताला त्याची सवय होते आणि स्नायूंची स्मरणशक्ती वाढते. पोश्चर आणि एर्गोनॉमिक्स सुधारते यामुळे दुखापत किंवा ताण येण्याचा धोका कमी होतो.