कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 11:27 IST2025-09-11T11:26:15+5:302025-09-11T11:27:15+5:30

या फोनला सिरॅमिक टायटॅनियम बॉडी देण्यात आली आहे. जीची जाडी केवळ 5.6mm एवढी आहे.

Who is Abidur Chaudhry? Who designed Apple's slimmest iPhone 17 Air? | कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air

कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air

मुंबई - Apple कंपनीने अलीकडेच त्यांचे नवीन फोन लॉन्च केले आहेत. कंपनीने iPhone 17, iPhone 17, iPhone Air, iPhone Pro आणि iPhone 17 Pro max बाजारात आणले आहेत. Apple च्या या लॉन्चिंग सोहळ्यात iPhone Air च्या डिझाईनची बरीच चर्चा आहे. हा आतापर्यंतच्या iPhone सीरीजमधील सर्वात स्लीम फोन आहे. जो अबिदुर चौधरी यांनी डिझाईन केला आहे.

अ‍ॅपलच्या या फोन लॉन्चिंगनंतर अबिदुर चौधरी कोण आहेत असा प्रश्न अनेकांना पडला आहे. iPhone Air च्या डिझाईनमध्ये त्याचा मोठा वाटा असल्याचे बोलले जाते. अबिदुर चौधरी हे अ‍ॅपल कंपनीत इंडस्ट्रियल डिझायनर म्हणून कार्यरत आहेत आणि ते सॅन फ्रान्सिस्को, युनायटेड स्टेट्स येथे राहतात. ते लंडनमध्ये जन्मले आहेत. त्यांचे बालपण तिथेच गेले आहे. त्यांनी युनायटेड किंग्डममधील लॉफबरो युनिव्हर्सिटीमधून प्रोडक्ट डिझाइन आणि टेक्नॉलॉजीमध्ये बॅचलर डिग्री घेतली आहे. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी कॅम्ब्रिज कन्सल्टंट्स आणि कर्वेंटा येथे इंडस्ट्रियल डिझाइन इंटर्न म्हणून काम केले, तसेच लेयर डिझाइनमध्ये इंडस्ट्रियल डिझायनर म्हणूनही काम केले. 

लंडनमध्ये फ्रीलान्सिंग केल्यानंतर जानेवारी २०१९ मध्ये ते Apple मध्ये ज्वाईन झाले. तेव्हापासून आतापर्यंत जवळपास सात वर्षांपासून तेथे काम करत आहेत. ९ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या Apple च्या इव्हेंटमध्ये अबिदुर चौधरी यांनी iPhone Air लोकांसमोर आणला. त्यांनी या डिव्हाइसचे डिझाइन आणि वैशिष्ट्ये सादर करताना सांगितले की, हा आयफोन आतापर्यंतचा सर्वात पातळ असूनही प्रो मॉडेलच्या फिचर्सने भरलेला आहे. याच्या टायटॅनियम डिझाइन, सेरॅमिक शील्ड आणि इतर वैशिष्ट्यांवर भर दिला. Apple मध्ये इंडस्ट्रियल डिझायनर म्हणून ते या उत्पादनाच्या डिझाइन प्रक्रियेत सहभागी होते. ज्यामुळे त्यांना हे उत्पादन सादर करण्याची संधी मिळाली. 

काय आहेत वैशिष्टे?

नव्या iPhone Air ची सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे याचे डिझाइन. जी सर्वात मजबूत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या फोनला सिरॅमिक टायटॅनियम बॉडी देण्यात आली आहे. जीची जाडी केवळ 5.6mm एवढी आहे. महत्वाचे म्हणजे, युजर्सना एवढ्या स्लीम डिझाइनसोबत Pro डिव्हाइस प्रमाणे, परफॉर्मंन्स मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे. डिव्हाइसला 6.5 इंचांच्या डिस्प्लेवर सिरॅमिक शील्डची सुरक्षितता देण्यात आली आहे. तसेच ही सेफ्टी बॅक पॅनलवरही मिळते. यात 120Hz ProMotion डिस्प्ले मिळतो. जो 3000nits चा पीक ब्राइटनेस ऑफर करतो. डिव्हाइसमध्ये A19 Pro प्रोसेसर देण्यात आले आहे. हा कुठल्याही स्मार्टफोनमध्ये मिळणारा सर्वात फास्ट चिप सेट आहे. 

Web Title: Who is Abidur Chaudhry? Who designed Apple's slimmest iPhone 17 Air?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.