शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

सीईओ सुंदर पिचाई यांचाच जन्मदिवस चुकीचा सांगतय Google, समोर आल्या दोन तारखा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 15:59 IST

आज पिचाई यांचा जन्मदिवस साजरा केला जात आहे, मात्र, त्यांच्या जन्म तारखेवरून चर्चा सुरू आहे.

नवी दिल्ली - सर्वात मोठे सर्च इंजन असलेल्या Google चे सीईओ Sundar Pichai यांचा आज 10 जून जन्मदिवस आहे की नाही? यावरून सध्या जबरदस्त चर्चा सुरू आहे. Sundar Pichai यांना आज अनेक लोक ट्विटरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तर काही ट्विटर यूझर्स त्यांच्या जन्म तारखा वेगवेगळ्या असल्याचे म्हणत आहेत.  आज पिचाई यांचा जन्मदिवस साजरा केला जात आहे, मात्र, त्यांच्या जन्म तारखेवरून चर्चा सुरू आहे. Google वरच सुंदर पिचाई यांच्या जन्माच्या दोन तारखा दाखवल्या जात आहेत. एक तारीख आजची दाखवली जात आहे. तर दुसरी तारीख 12 जुलै दाखवली जात आहे. यावर Reuters च्या एका फॅक्ट बॉक्सनुसार, सुंदर पिचाई यांचा जन्म तामिळनाडूमध्ये 10 जून 1972 रोजी झाला. यात The New Indian Express चा हवाला देण्यात आला आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो, की गुगल आपल्याच सीईओच्या दोन-दोन तारखा का दाखवत आहे?

 Google चा हा सर्च रिझल्ट पिचाई यांची बायोग्राफी Britannica वरून येत आहे. यात त्यांचा बर्थडे 12 जुलै सांगण्यात आला आहे. Britannica वर जेव्हापासून बर्थडे पब्लिश झाला, तेव्हापासून कदाचीत यात बदल केलेला नाही. हे 2 ऑक्टोबर 2016 रोजी प्रकाशित करण्यात आले होते.

 Sundar Pichai सध्या Alphabet चे हेड आहे. Alphabet ही गूगलची पॅरेंट कंपनी आहे. सुंदर पिचाई यांनी इंजिनिअरिंगपर्यंतचे शिक्षण Indian Institute of Technology मधून पूर्ण केले आहे. त्यांचे बालपण चेन्नईत गेले. सुंदर पिचाई यांनी Stanford University तून मास्टर डिग्री मिळविली आहे. यानंतर त्यांनी Wharton School मधून MBA केले. सुंदर पिचाई यांनी 2004 मध्ये Google जॉइन केले. त्यांनी गुगलमध्ये Google Toolbar आणि नंतर Google Chrome चे डेव्हलपमेंटदेखील साभाळले होते. Google Chrome सध्या सर्वाधिक प्रसिद्ध इंटरनेट ब्राउझर आहे.

टॅग्स :Sundar Pichaiसुंदर पिचईgoogleगुगलTwitterट्विटर