मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अॅप लाँच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 12:26 IST2026-04-09T12:25:09+5:302026-04-09T12:26:09+5:30
WhatsApp Apple CarPlay App Marathi: व्हॉट्सॲपने आयफोन युजर्ससाठी Apple CarPlay नेटिव्ह अॅप लाँच केले आहे. आता कारच्या डॅशबोर्डवरून चॅट्स आणि कॉल्स मॅनेज करणे सोपे होईल. जाणून घ्या सविस्तर फीचर्स.

मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अॅप लाँच
ड्रायव्हिंग करताना सुरक्षितपणे संवाद साधता यावा यासाठी व्हॉट्सॲपने आयफोन युजर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट आणले आहे. व्हॉट्सॲपने आता 'ॲपल कारप्ले' साठी आपले स्वतंत्र 'नेटिव्ह अॅप' लाँच केले आहे. यामुळे आता कार चालवताना व्हॉट्सॲप वापरणे अधिक सोपे आणि सुरक्षित होणार आहे.
व्हॉट्सॲपच्या iOS व्हर्जन २६.१३.७४ सह हे नवीन फीचर देण्यात आले आहे. यापूर्वी कारप्लेमध्ये व्हॉट्सॲप केवळ नोटिफिकेशन स्वरूपात उपलब्ध होते, परंतु आता कारच्या स्क्रीनवर व्हॉट्सॲपचा स्वतंत्र आयकॉन आणि इंटरफेस पाहायला मिळेल.
प्रमुख वैशिष्ट्ये...
स्वतंत्र इंटरफेस: कारच्या डिस्प्लेवर आता 'चॅट्स' आणि 'कॉल हिस्ट्री' असे दोन वेगळे टॅब मिळतील. यामुळे युजर्सना त्यांच्या अलीकडील संभाषणांची यादी थेट पाहता येईल.
हँड्स-फ्री मेसेजिंग: सुरक्षिततेच्या दृष्टीने ड्रायव्हर पूर्ण चॅट विंडो उघडू शकणार नाही, मात्र 'व्हॉइस डिक्टेशन' द्वारे बोलून मेसेज टाईप करणे आणि पाठवणे शक्य होईल.
सिरीवरील अवलंबित्व कमी: यापूर्वी प्रत्येक गोष्टीसाठी 'सिरी'ला कमांड द्यावी लागत असे. आता अनेक फीचर्स थेट कारच्या टच स्क्रीनवरून किंवा कंट्रोल बटणांवरून वापरता येतील.
सुरक्षा: कारप्लेवरून केलेले सर्व कॉल्स आणि मेसेजेस हे नेहमीप्रमाणे 'एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड' असतील.
कसे वापरावे?
हे फीचर वापरण्यासाठी युजर्सनी आपले व्हॉट्सॲप लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट करून आयफोन कारप्ले सपोर्ट असलेल्या कारशी कनेक्ट करणे आवश्यक आहे.