WhatsApp चे शानदार फीचर, 'या' ट्रिकमुळे समजेल तुम्हाला कोण ट्रॅक करतंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 17:20 IST2025-01-09T17:20:04+5:302025-01-09T17:20:16+5:30

WhatsApp : कंपनीने गेल्या काही महिन्यांत आपल्या युजर्सच्या सोयीसाठी अनेक धमाकेदार फीचर्स आणली आहेत.

WhatsApp's amazing feature, with this trick you will know who is tracking you? | WhatsApp चे शानदार फीचर, 'या' ट्रिकमुळे समजेल तुम्हाला कोण ट्रॅक करतंय?

WhatsApp चे शानदार फीचर, 'या' ट्रिकमुळे समजेल तुम्हाला कोण ट्रॅक करतंय?

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) हे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन आहे. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे अनेक युजर्सना चॅटिंगसह व्हॉइस कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंग, ऑनलाइन पेमेंट, डॉक्युमेंट शेअरिंग इत्यादी अनेक सुविधा मिळतात. व्हॉट्सअ‍ॅप लाँच होऊन अनेक वर्षे उलटून गेली असली तरी, कंपनी अजूनही त्यात नवीन अपडेट्स आणत आहे. 

कंपनीने गेल्या काही महिन्यांत आपल्या युजर्सच्या सोयीसाठी अनेक धमाकेदार फीचर्स आणली आहेत. अशातच व्हॉट्सअ‍ॅपच्या एका फीचरबद्दल जाणून घ्या, ते तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या सुरक्षितता आणि गोपनीयता फीचर्ससाठी ओळखले जाते. त्यामुळेच ३.५ बिलियनहून अधिक युजर्स ते वापरतात. 

या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला लाईव्ह लोकेशन सारख्या अनेक अ‍ॅडव्हॉन्स सुविधा देखील मिळतात. लाईव्ह लोकेशन फीचर्सच्या मदतीने तुम्ही कोणालाही सहजपणे ट्रॅक करू शकता. जरी हे फीचर खूप सोयीस्कर असले, तरी आपण चूक केली तर त्यामुळे मोठे नुकसान देखील होऊ शकते.

अनेकदा असे घडते की, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याकडे येत असते आणि त्याला आपले लोकेशन माहित नसते. तेव्हा ती व्यक्ती आपल्याला आपले लाईव्ह लोकेशन विचारतो. आपण आपले लाईव्ह लोकेशन शेअर करतो पण नंतर ते बंद करायला विसरतो. जर तुम्हीही असे केले असेल तर यामुळे तुमची गोपनीयता धोक्यात येऊ शकते. 

दरम्यान, तुमच्या लाईव्ह लोकेशनमुळे काम पूर्ण झाल्यानंतरही कोणीही तुम्हाला सहजपणे ट्रॅक करू शकते. जर तुम्ही तुमचे लाईव्ह लोकेशन एखाद्याला पाठवले असेल. मात्र, नंतर ते बंद करायला विसरलात, तर यासाठी व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला एक सीक्रेट फीचर देत आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमचे लाईव्ह लोकेशन कोणाला पाठवले आहे, हे सहज ओळखू शकता. 

याबाबत संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या...
- तुमचे लोकेशन कोणाला मिळाले आहे, हे जाणून घेण्यासाठी, तुम्हाला सर्वातआधी व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप्लिकेशनवर जावे लागेल.
- आता तुम्हाला डिस्प्लेच्या वरच्या बाजूला दिसणाऱ्या ३ डॉट मेनू आयकॉनवर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला सेटिंग्ज ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला प्रायव्हसी ऑप्शनवर जावे लागेल.
- यानंतर तुम्हाला थोडे खाली स्क्रोल करावे लागेल आणि लोकेशन ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
- तुम्ही लोकेशनवर क्लिक करताच, तुम्हाला कळेल की तुम्ही लाईव्ह लोकेशन कोणाला पाठवले आहे. तुम्ही आता येथून लाईव्ह लोकेशन बंद करू शकता.

Web Title: WhatsApp's amazing feature, with this trick you will know who is tracking you?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.