WhatsApp will soon offer dark mode feature to users | व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना लवकरच देणार 'ही' सुविधा
व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना लवकरच देणार 'ही' सुविधा

नवी दिल्ली: व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं यासाठी नवनवीन फीचर आणत असतं. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपच्या डार्क मोड फीचरची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच WABetaInfoने देखील या संर्दभात ट्विट करुन माहिती दिली आहे. 

कंपनी Android Developers आणि Apple iOS Developers वर Dark Mode फीचरवर काम करत आहे. व्हॉट्सअ‍ॅप युजर्स खूप दिवसांपासून या फीचरची वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी डार्क मोड फीचरचे काही फोटो हे लीक झाले होते. त्यातच आता WABetaInfo कंपनीने ट्विट करत लवकरच व्हॅाट्सअ‍ॅपसाठी डार्क मोड काम सुरु असून लवकरच ते युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. मात्र डार्क मोड कधीपासून नक्की उपलब्ध होणार आहे यासंबधीत कोणतीही माहिती देण्यात अलेली नाही.

Web Title: WhatsApp will soon offer dark mode feature to users

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.