शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सावधान! एक WhatsApp कॉल उडवणार सर्व डेटा; असा करा बचाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 3:43 PM

व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करण्याची अनेकदा माहिती मिळते. मात्र युजर्स ती गोष्ट टाळतात. पण युजर्सची ही एक छोटीशी चूक त्यांना महागात पडू शकते.

ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅप अपडेट करण्याची अनेकदा माहिती मिळते. मात्र युजर्स ती गोष्ट टाळतात. पण युजर्सची ही एक छोटीशी चूक त्यांना महागात पडू शकते. Whatsapp कॉलच्या माध्यमातून हा बग स्पायवेअर इन्स्टॉल करण्याची परवानगी देतो.फोनमधील सर्व डेटा, कॉल लॉग, ईमेल, मेसेज, फोटो, व्हिडीओ या सर्व गोष्टी बगमुळे डिलीट होऊ शकतात. 

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने अनेक जण त्याचा वापर करत असतात. व्हॉट्सअ‍ॅपही आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करण्याची अनेकदा माहिती मिळते. मात्र युजर्स ती गोष्ट टाळतात. पण युजर्सची ही एक छोटीशी चूक त्यांना महागात पडू शकते. त्वरीत व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करा कारण व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक बग सापडला आहे. 

Whatsapp कॉलच्या माध्यमातून हा बग स्पायवेअर इन्स्टॉल करण्याची परवानगी देतो. म्हणजेच स्मार्टफोनवर येणारा एखादा कॉल देखील धोकादायक ठरणार आहे. मग तो कॉल युजर्सने केला असेल अथवा युजर्सने तो रिसीव्ह केला असेल तरी त्याचा फटका बसणार आहे. फोनमधील सर्व डेटा, कॉल लॉग, ईमेल, मेसेज, फोटो, व्हिडीओ या सर्व गोष्टी बगमुळे डिलीट होऊ शकतात. 

Financial Times च्या एका रिपोर्टनुसार, NSO द्वारे विकसित केलेला कोड युजर्सच्या स्मार्टफोनवर ट्रान्समिट केला जाऊ शकतो. कॉल रिसीव्ह केला नाही तरी असं होऊ शकतं. त्यामुळे कॉल आला आहे की नाही हे समजण्याचा कोणताच मार्ग नाही आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलेल्या या बगची माहिती मिळाली होती. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपने आपलं सर्व्हर सुरक्षित करण्यासाठी याचं अपडेट रोल आऊट करायला सुरुवात केली. या बगचा फटका किती युजर्सना बसला आहे याचा तपास सध्या व्हॉट्सअ‍ॅप करत आहे. व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करून या बगपासून युजर्स बचाव करू शकतात. 

WhatsApp वर आलं नवं फीचर; नोटीफिकेशनमध्ये दिसणार स्टीकर्स 

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी स्टीकर्स फीचरमध्ये अपडेट आणत आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये येणाऱ्या या नव्या अपडेटमध्ये ‘Sticker Notification Preview’ नावाचं नवं फीचर पाहायला मिळणार आहे. आयओएसच्या बीटा व्हर्जन 2.19.50.21 मध्ये हे फीचर देण्यात आले आहे. आता लवकरच अँड्रॉईड बीटावर देखील ते पाहायला मिळणार आहे.  ‘Sticker Notification Preview’ हे फीचर व्हॉट्सअ‍ॅपवर आल्यानंतर अ‍ॅपवर एखादा मेसेज, स्टीकर, फोटो, व्हिडीओ आल्यावर नोटीफिकेशनमध्ये टेक्स्ट आणि इमोजी येणार आहे. स्टीकरसाठी नोटीफिकेशन बारमध्ये सध्या स्टीकर असं लिहिलेलं दिसतं. मात्र आता या नव्या फीचर नंतर युजर्सना पाठवलेला स्टीकर दिसणार आहे. तसेच मेसेज ओपन न करता कोणता स्टीकर पाठवण्यात आला आहे ते पाहता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपचं नवं अपडेट गुगल प्ले स्टोरवर बीटा प्रोग्रामचा वापर करणाऱ्या युजर्ससाठी आले आहे. या व्हर्जनमध्ये स्टीकर प्रिव्यू फीचरची चाचणी करण्यात येत आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅप Animated stickers वर देखील काम करत असल्याची माहिती मिळत आहे. 

WhatsApp स्टेटसमुळे त्रस्त असाल तर 'ही' ट्रिक करेल मदत

 व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक जण आपली स्टोरी ही स्टेटसवर शेअर करत असतात. मात्र काही वेळेस त्याचा कंटाळा येतो. मात्र या स्टेटसपासून युजर्सना त्यांची सुटका करता येते. व्हॉट्सअ‍ॅपवर कॉन्टॅक्ट लिस्टमधील अनेकांचे स्टेटस दिसत असते. जर युजर्सना ते स्टेटस कायमचं डिलीट करायचं असेल तर सर्वप्रथम फोनचं इंटरनेट बंद करा. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप बंद करून स्मार्टफोनच्या सेटींगमध्ये जा. तिथे व्हॉट्सअ‍ॅपला फोर्स स्टॉप करा. यानंतर ही काही वेळ ऑफलाईन राहा म्हणजेच फोनचं इंटरनेट बंद ठेवा. त्यानंतर फोनच्या टाईम सेटींगमध्ये जाऊन तेथे असलेल्या वेळेपेक्षा 24 तास पुढे असलेली वेळ देऊन वेळ बदला. फोनची वेळ बदलल्यानंतर टाईम सेटींग बंद करा. त्यानंतर बंद केलेले फोनचे इंटरनेट सुरू करा. तसेच व्हॉट्सअ‍ॅप सुरू करा. त्यानंतर कोणाचेही स्टेटस दिसणार नाही. 

IPL सीझनसाठी Whatsapp चा स्पेशल क्रिकेट स्टीकर पॅक, असा करा डाऊनलोड गेल्या वर्षी व्हॉट्सअ‍ॅपने अ‍ॅन्डॉईड आणि आयओएस अ‍ॅपवर स्टीकर फीचर आणलं होतं. त्यामध्ये नवनवीन पॅक येत असतात. आता व्हॉट्सअ‍ॅपने स्पेशल क्रिकेट स्टीकर पॅक आणला आहे. क्रिकेट प्रेमी लगेचच हा पॅक डाऊनलोड करू शकतात. सध्या हा स्टीकर पॅक व्हॉट्सअ‍ॅपमध्ये दिसत नाही तर तो अ‍ॅड करावा लागतो. स्पेशल क्रिकेट स्टीकर पॅक एकदा डाऊनलोड आणि इन्स्टॉल केल्यानंतर अगदी सोप्या पद्धतीने इमोजीप्रमाणे त्याचा वापर करता येतो. स्टीकर्सचा वापर हा मोठ्या प्रमाणात युजर्सकडून केला जातो. 

WhatsApp युजर्ससाठी Bad News; आता 'हे' खास फीचर मिळणार नाही

WhatsApp चं नवं अपडेट, 'या' फीचरच्या जागेत झाला बदल

इन्संट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp हे आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. WhatsApp ने पुन्हा एकदा आपल्या युजर्ससाठी एक खास बदल केला आहे. WABetaInfo ने याबाबतची माहिती दिली आहे. WhatsApp ने अपडेट केल्यानंतर एका फीचरच्या जागेत बदल केला आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जन 2.19.101 अपडेटमध्ये 'अर्काइव्ड चॅट्स' या फीचरला मेन साइड मेन्यूमध्ये जागा देण्यात आली आहे. सध्या हा पर्याय चॅटमध्ये सर्वात खाली दिसत आहे. मात्र व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्य़ा अपडेटनंतर Archived Chats मेन मेन्यूमध्ये दिसणार आहे. 

WhatsApp वरचे जुने Emojis गायब होणार; 'हे' आहे कारण  

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅप आपल्या नव्या डूडल फीचरमध्ये काही विशेष बदल करणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप अपडेट झाल्यानंतर डूडल फीचरमधील जुने Emojis गायब होणार असून, त्याजागी ऑफिशियल Emojis येणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवर इमोजीच्या माध्यमातून चॅटींगची गंमत आणखी वाढत असते. तसेच मेसेज टाईप करण्यापेक्षा इमोजीच्या माध्यमातून संवाद साधणं अनेकांना जास्त सोयीचं वाचत असतं. सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या डूडलमध्ये अनेक कस्टमाइज स्टीकर्स आहेत, जे मीडिया फाइल पाठवताना एडिट ऑप्शन सिलेक्ट करून फोटोवर लावता येतात. व्हॉट्सअ‍ॅप मधले हे अपडेट्स पाहायचे असतील तर फिचर Enable करावं लागेल त्याशिवाय ते Doodle UI मध्ये दिसणार नाहीत असं WABetaInfoने म्हटलं आहे. हा बदल घडवून आणण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ने बीटा व्हर्जन 2.19.106 मधले जुने Emojis काढून त्याठिकाणी नवे Emojis टाकले आहेत.

 

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान