सावधान! तुम्हाला मोठ्या अडचणीत आणू शकतं WhatsApp चं 'हे' खास फीचर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 17:44 IST2025-01-26T17:44:51+5:302025-01-26T17:44:51+5:30
WhatsApp मध्ये अनेक फीचर्स आहेत, ज्यांचा वापर खूप केला जातो. पण एक खास फीचर आहे, जे तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतं.

सावधान! तुम्हाला मोठ्या अडचणीत आणू शकतं WhatsApp चं 'हे' खास फीचर
WhatsApp हे एक लोकप्रिय मेसेजिंग App आहे. भारतासह जगभरात बरेच लोक हे App वापरतात. WhatsApp मध्ये अनेक फीचर्स आहेत, ज्यांचा वापर खूप केला जातो. पण एक खास फीचर आहे, जे तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतं. WhatsApp मध्ये व्ह्यू वन्स फीचर आहे. या फीचर अंतर्गत पाठवलेले फोटो पाहिल्यानंतर लगेचच डिलीट होतात.
व्ह्यू वन्स फीचर हे जितकं आपल्याला वाटतं तितकं सुरक्षित नाही. तुम्ही पाठवलेले फोटो पुन्हा एकदा 'व्ह्यू वन्स' फीचर अंतर्गत पाहू शकता. या फीचरमध्ये एक त्रुटी आढळली आहे, ज्यामुळे युजर्सच्या प्रायव्हसीला धोका निर्माण झाला आहे.
WhatsApp च्या व्ह्यू वन्स फीचरमधील त्रुटी ही फक्त आयफोनमध्ये पाहायला मिळाली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, आयफोन युजर्स हे व्ह्यू वन्स असलेले फोटो वारंवार पाहू शकतात. यासाठी युजर्स एक खास प्रोसेस फॉलो करत आहेत.
ही टेक्निकल त्रुटी आहे की आणखी काही याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. WhatsApp युजर्सच्या प्रायव्हसीसाठी मेटा अनेक फीचर्स देत असतं. तुम्ही तुमचा प्रोफाईल फोटो देखील हाईड करू शकता.