शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

WhatsApp वरचे जुने Emojis गायब होणार; 'हे' आहे कारण  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 2:15 PM

WhatsApp हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. व्हॉट्सअ‍ॅप  आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं.

ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅप आपल्या नव्या डूडल फीचरमध्ये काही विशेष बदल करणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप अपडेट झाल्यानंतर डूडल फीचरमधील जुने Emojis गायब होणार असून, त्याजागी ऑफिशियल Emojis येणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅप मधलं Sticker हे फीचरसुद्धा अपडेट केलं जात असल्याची माहिती मिळत आहे.

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅप लवकरच नवे अपडेट्स घेऊन येत आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅप आपल्या नव्या डूडल फीचरमध्ये काही विशेष बदल करणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप अपडेट झाल्यानंतर डूडल फीचरमधील जुने Emojis गायब होणार असून, त्याजागी ऑफिशियल Emojis येणार आहेत. 

व्हॉट्सअ‍ॅपवर इमोजीच्या माध्यमातून चॅटींगची गंमत आणखी वाढत असते. तसेच मेसेज टाईप करण्यापेक्षा इमोजीच्या माध्यमातून संवाद साधणं अनेकांना जास्त सोयीचं वाचत असतं. सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या डूडलमध्ये अनेक कस्टमाइज स्टीकर्स आहेत, जे मीडिया फाइल पाठवताना एडिट ऑप्शन सिलेक्ट करून फोटोवर लावता येतात. व्हॉट्सअ‍ॅप मधले हे अपडेट्स पाहायचे असतील तर फिचर Enable करावं लागेल त्याशिवाय ते Doodle UI मध्ये दिसणार नाहीत असं WABetaInfoने म्हटलं आहे. हा बदल घडवून आणण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ने बीटा व्हर्जन 2.19.106 मधले जुने Emojis काढून त्याठिकाणी नवे Emojis टाकले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप मधलं Sticker हे फीचरसुद्धा अपडेट केलं जात असल्याची माहिती मिळत आहे.  WABetaInfo ने केलेल्या ट्वीटनुसार व्हॉट्सअ‍ॅप लवकरच Animated Stickers लाँच करणार असल्याचं म्हटलं आहे. हा बदल iOS, अ‍ॅन्ड्रॉईड आणि वेब या तिन्ही प्लॅटफार्मवर उपलब्ध राहणार असून सध्या त्याची चाचणी घेण्यात येत आहे. 

WhatsApp वर आलं 'इग्नोर आर्काइव्ह चॅट्स' फीचर, जाणून घ्या खासियत 

...तर तुमचं WhatsApp अकाऊंट होणार ब्लॉक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया साईट्स आपल्या प्लॅटफॉर्मवर अनेक नवनवीन बदल करत आहे. फेक न्यूज किंवा तेढ निर्माण करणाऱ्या मेसेजला आळा घालण्यासाठी सोशल मीडिया कठोर पावलं उचलत आहे. व्हॉट्सअ‍ॅपनेही  काही फोन नंबर ब्लॉक केले आहे. तसेच काही युजर्सचे चॅट फीचरही बंद केले आहे. चार मुख्य कारणांमुळे व्हॉट्सअ‍ॅपने हे फोन नंबर ब्लॉक केले असल्याची माहिती समोर आली आहे. 

WhatsApp वर क्वालिटी खराब न करता 'असे' पाठवा फोटो

चॅटींगची गंमत वाढणार; आता लँडलाईन नंबरवरही WhatsApp चालणार

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. पण तुम्हाला माहित आहे का? WhatsApp आता लँडलाईन नंबरवरही चालणार आहे. युजर्स आपल्या लँडलाईन नंबरसोबत आपल्याला हवं असल्यास व्हॉट्सअ‍ॅप कनेक्ट करू शकतात यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कोणासोबत शेअर करण्याचीही गरज लागणार नाही व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरचा फायदा हा WhatsApp Business App युजर्सना अधिक होणार आहे. या फीचरच्या मदतीने व्यावसायिक आपल्या लँडलाईन नंबरवरून आरामात व्हॉट्सअ‍ॅप  ऑपरेट करू शकतात. तसेच या फीचरचं वैशिष्ट्य म्हणजे युजर्सचा पर्सनल मोबाईल नंबर तुम्हाला नको असलेल्या लोकांसोबत शेअर करता येत नाही. 

WhatsApp चे 'हे' 5 फीचर्स करणार कमाल; चॅटिंग करताना येणार धमाल 

असा तपासा व्हॉट्सअ‍ॅपवर येणारा फेक मॅसेज

निवडणुकीचा हंगाम, आरोग्य आणि इतर अनेक गोष्टींवर सकाळ संध्याकाळ व्हॉट्सअ‍ॅपवर मॅसेज येत असतात. जवळच्या व्यक्तीने पाठविला असल्याने आपण त्यावर लगेचच विश्वास ठेवतो. जरा थांबा. कशावरून त्या व्यक्तीने तो मॅसेज वाचूनच पुढे पाठविला असेल. खोटा मॅसेज परविणाऱ्याचे हेतू वेगवेगळे असतात. यामुळे व्हॉट्सअ‍ॅपने हे मॅसेज खरे की खोटे हे करण्यासाठी नुकतेच एक टूल लाँच केले आहे. यास 'Checkpoint Tipline' अस नाव दिले आहे. PROTO या भारतीय मीडिया स्टार्टअप कंपनीने हे टूल विकसित केले आहे. PROTO ही कंपनी निवडणूक काळात पसरविले जाणार मॅसेज त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी काही संस्थांच्या शोधात आहे. अशा मॅसेजचा शोध लागल्यास त्याद्वारे होणाऱ्या दंगली, अफवा थांबविण्यात यश येणार आहे.

WhatsApp वर आलं नवं फीचर, मेसेज कितीवेळा फॉरवर्ड झाला हे समजणार

काही महिन्यांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने फॉरवर्ड मेसेजवर मर्यादा आणली होती. मात्र आता त्यामध्ये बदल करत व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन फीचर आणलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या फीचरमध्ये 'Forwarding Info' आणि 'Frequently Forwarded' यांचा समावेश करण्यात आला आहे. यातील फॉरवर्डिंग इन्फोमुळं मेसेज कितीवेळा फॉरवर्ड केला आहे याची माहिती मिळणार आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने हे नवे फीचर iOS आणि अ‍ॅन्ड्रॉईडच्या बीटा व्हर्जनवर लाँच केले आहे. iOS बीटा 2.19.40.23 आणि Android बीटा 2.19.86 व्हर्जनवर हे अपडेट दिसणार आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान