whatsapp users can now select contacts who can not add them in groups new feature spotted | Whatsapp ग्रुपमध्ये अ‍ॅड व्हायचं की नाही हे आता युजर्स ठरवणार; जाणून घ्या कसं

Whatsapp ग्रुपमध्ये अ‍ॅड व्हायचं की नाही हे आता युजर्स ठरवणार; जाणून घ्या कसं

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्सना एक अपडेट मिळालं आहे. अँड्रॉईड आणि आयओएस युजर्ससाठी ग्रुप प्रायव्हसी सेटिंग रोलआऊट केलं आहे. ज्यांच्या माध्यमातून कोणत्याही ग्रुपमध्ये अ‍ॅड व्हायचे नाही असे कॉन्टॅक्ट्स युजर्सना सिलेक्ट करता येणार आहे. 

व्हॉट्सअ‍ॅप फॉर iOS 2.19.110.20  व्हॉट्सअ‍ॅप फॉर अँड्रॉईड बीटा 2.19.298 मध्ये ग्रुपशी संबंधित नवी प्रायव्हसी सेटिंग समोर आली आहे. यामध्ये ग्रुपमधील कोणती व्यक्ती त्यांना अ‍ॅड करू शकते हे आता युजर्स ठरवू शकणार आहेत. यासाठी लागणाऱ्या परमिशनसाठी Everyone, My Contacts आणि My Contacts Except असे तीन पर्याय देण्यात येणार आहेत. तसेच ग्रुप अ‍ॅडमिन युजर्सना सरळ अ‍ॅड करू शकत नसतील तर इन्वाईट पाठवण्याचा एक पर्याय मिळणार आहे. हे इन्वाईट स्वीकारल्यानंतरच युजर्स त्या ग्रुपचा भाग होणार आहेत. सध्या या फीचरची टेस्टिंग सुरू आहे. 

मेसेजिंग अ‍ॅपमध्ये मिळणाऱ्या नव्या ग्रुप इन्विटेशन फीचरसाठी व्हॉट्सअ‍ॅपच्या क्लाईंटमध्ये जावं लागेल. सेटिंग्स> अकाउंट > प्रायव्हसी > ग्रुप्समध्ये बदलण्यासाठी पर्याय मिळतील. या ग्रुपच्या सब-सेक्शनमध्ये युजर्सना Everyone, My Contacts आणि  My Contacts Except असे तीन इन्विटेशन कंट्रोल ऑप्शन मिळतात. त्यानुसार या नव्या फीचरमध्ये युजर्स एखाद्या ग्रुपमध्ये अ‍ॅड व्हायचं की नाही हे ठरवू शकतात. प्रायव्हसी सेटिंगमध्ये Everyone असल्यास युजर्सना कोणतेही कॉन्टॅक्ट्स ग्रुपमध्ये अ‍ॅड करू शकतात.  My Contacts सेट असल्यास कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असलेले लोक युजर्सना अ‍ॅड करू शकतात.  My Contacts Except सेटिंगवर सिलेक्ट केलेले कॉन्टॅक्ट्स युजर्सना डायरेक्ट अ‍ॅड करू शकत नाहीत. लवकरच सर्व युजर्ससाठी हे फीचर रोलआऊट करण्यात येणार आहे. 

Be! Now you can share whatsapp status on Facebook | व्वा! आता व्हॉट्सअ‍ॅपचे स्टेटस फेसबुकवरही करता येणार शेअर

फोटो, व्हिडीओ, ऑडिओ हे व्हॉट्सअ‍ॅपवरून एकमेकांना पाठवले जातात. मात्र त्यातील काही फोटो हे खास असतात त्यामुळे ते सीक्रेट ठेवणं गरजेचं असतं. व्हॉट्सअ‍ॅपवर आलेले काही खास फोटो किंवा व्हिडीओ हे फोटोगॅलरीत दिसू नये असं अनेक युजर्सना वाटत असतं. त्यामुळे ते फोटो डिलीट करतात. मात्र व्हॉट्सअ‍ॅपवर आलेले हे फोटो आणि व्हिडीओ डिलीट करण्याची काही गरज नाही. ते फोनमध्ये ठेवता येतात. यासाठी चॅटमध्ये जाऊन अथवा ग्रुपमध्ये जाऊन त्या कॉन्टॅक्टवर टॅप करा. टॅप केल्यावर मीडिया व्हिजिबिलीटीचा एक पर्याय मिळेल. तेथे NO असं करा. असं केल्यानंतर फोटो अथवा व्हिडीओ फोनच्या गॅलरीमध्ये दिसणार नाही. 

काय सांगता? 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही WhatsApp

WhatsApp कमाल करणार; चॅट आपोआपच गायब होणार

व्हॉट्सअ‍ॅपवरून लोकेशन देखील शेअर केलं जातं. लोकेशन शेअर करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटमध्ये अटॅचमेंट ऑप्शन देण्यात आला आहे. त्यावर क्लिक करून शेअर लोकेशन लाईव्हचा पर्याय मिळेल. लाईव्ह लोकेशन युजर्स 15 मिनिट, एक तास आणि आठ तासांसाठी शेअर करू शकतात.  राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅपवरही गुगलप्रमाणेच हवं ते सर्च करता येणार आहे. 

 

Web Title: whatsapp users can now select contacts who can not add them in groups new feature spotted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.