शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
3
“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना सत्तेचा माज…”, बाळराजे पाटलांना अजितदादांच्या आमदाराने सुनावले
4
सावधान! फक्त एक फोन कॉल अन् गमावले तब्बल ३२ कोटी; महिलेसोबत नेमकं काय घडलं?
5
लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत
6
"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा
7
Eye Infections: मुंबईत वाढताहेत संसर्गाचे रुग्ण; डोळ्यांत डोळे घालाल तर पस्तावाल, 'अशी' घ्या काळजी!
8
१,२,३,४... बाप रे बाप...! एका ऑटोरिक्‍शातून बाहेर पडली तब्बल 22 मुलं! व्हिडिओ बघून धक्का बसेल
9
९४% रिटर्न दिल्यावर 'ग्रोव'ला १०% लोअर सर्किट! गुंतवणूकदारांनी शेअर विकायला का लावली रांग?
10
प्रशासकीय दिरंगाईमुळे बोनस रखडला; संतप्त कामगारांचे नायर रुग्णालयासमोर 'बोंबाबोंब' आंदोलन
11
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
12
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
“आता ‘प्रो बैलगाडा लीग’ लवकरच, महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा...”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
14
सरकारच्या 'या' स्कीममध्ये मिळवा विना गॅरेंटी व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन; केवळ एका डॉक्युमेंटची लागेल गरज
15
मुलांच्या भवितव्याशी खेळ! Noge, Eare, Iey... चुकीचं इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाचा Video व्हायरल
16
आरक्षण मर्यादेचं उल्लंघन, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी, सुप्रिम कोर्टात आज काय घडलं
17
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
18
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
19
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
20
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अरे व्वा! WhatsApp ने एकाच वेळी आणले 3 धमाकेदार फीचर्स; अकाऊंट होणार अधिक सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 13:03 IST

कंपनीने तीन नवीन फीचर्स जारी केले आहेत, जे चांगल्या सुरक्षिततेसाठी आहेत.

WhatsApp हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. कंपनीने तीन नवीन फीचर्स जारी केले आहेत, जे चांगल्या सुरक्षिततेसाठी आहेत. नवीन अपडेटमध्ये अकाऊंट प्रोटेक्ट, डिव्हाइस व्हेरिफिकेशन आणि ऑटोमॅटिक सिक्योरिटी कोडचे फीचर्स जोडण्यात आले आहेत. WhatsApp च्या मते ते सिक्योरिटी मॅकेनिज्म वाढवत आहे. याच्या मदतीने युजर्स त्यांचे अकाउंट सुरक्षित ठेवू शकतात. मोबाईल फोन हॅकिंगच्या वाढत्या घटना पाहता हे फीचर्स जारी करण्यात आले आहेत.

WhatsApp अकाऊंट प्रोटेक्ट

WhatsApp च्या या फीचरमुळे युजर्सना सुरक्षेचा एक नवीन स्तर मिळतो. जेव्हा एखादा युजर आपला फोन बदलतो आणि नवीन फोनमध्ये WhatsApp वर लॉग इन करतो, तेव्हा त्याला OTP व्यतिरिक्त आणखी एक स्टेप फॉलो करावी लागेल.

ओटीपी टाकल्यानंतर, युजर्सच्या जुन्या फोनवर एक सूचना दिसेल, ज्यामध्ये युजर्सना नवीन डिव्हाइसवर स्विच करायचे आहे की नाही हे विचारले जाईल. हे फीचर आपोआप चालू राहील आणि यासाठी कोणत्याही सेटिंगमध्ये जाण्याची गरज नाही.

WhatsApp चे हे फीचर युजर्सना केवळ त्यांचे खातेच नाही तर त्यांचे UPI खाते सुरक्षित ठेवण्यासही मदत करेल. खरं तर, अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये एखाद्या युजर्सचा फोन हरवल्यानंतर त्यांच्या WhatsApp UPI वरून पैसे ट्रान्सफर केले गेले आहेत.

डिव्हाइस व्हेरिफिकेशन

नवीन फीचर WhatsApp युजर्सचे डिव्हाइस हॅक झाल्यास त्यांचे संरक्षण करेल. WhatsApp नुसार, मालवेअर हा कोणत्याही स्मार्टफोनसाठी सर्वात मोठा धोका असतो. मालवेअरच्या मदतीने, युजर्सच्या WhatsApp वरून मेसेज पाठविला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत WhatsApp चे हे फीचर युजर्सच्या खात्याचं संरक्षण करेल.

WhatsApp ऑटोमॅटिक सिक्योरिटी कोड

WhatsApp चॅट्स एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह येतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार, चॅटमध्ये उपस्थित असलेल्या लोकांशिवाय इतर कोणीही ते मेसेज वाचू शकत नाही. युजर्स मॅन्युअली तपासू शकतात की त्यांचा संपर्क एनक्रिप्शन वापरत आहे की नाही.

आता कंपनी ऑटोमॅटिक सिक्युरिटी कोड फीचर जोडत आहे. या फीचरच्या मदतीने, युजर्स त्यांच्या चॅट्स एनक्रिप्टेड आहेत की नाही हे ऑटोमॅटिक व्हेरिफाय करू शकतात. यापूर्वी यासाठी लाँग प्रोसेस करावी लागत होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान