WhatsApp स्टेटसला फेसबुक स्टोरी बनवायचंय? मग 'या' स्टेप्स करतील मदत 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2019 12:01 PM2019-07-07T12:01:37+5:302019-07-07T12:09:26+5:30

व्हॉट्सअ‍ॅपचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात केला जातो. व्हॉट्सअ‍ॅप देखील आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं.

whatsapp update how to share whatsapp status to facebook stories | WhatsApp स्टेटसला फेसबुक स्टोरी बनवायचंय? मग 'या' स्टेप्स करतील मदत 

WhatsApp स्टेटसला फेसबुक स्टोरी बनवायचंय? मग 'या' स्टेप्स करतील मदत 

googlenewsNext
ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅपचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात केला जातो. व्हॉट्सअ‍ॅप देखील आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. WhatsApp चं स्टेटस आता फेसबुक आणि इतर अ‍ॅपवर शेअर करता येणार आहे.

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅपचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात केला जातो. व्हॉट्सअ‍ॅप देखील आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. WhatsApp स्टेटस अपडेट फीचर हे काही दिवसांपूर्वीचे आले आहे. त्यामुळे WhatsApp चं स्टेटस आता फेसबुक आणि इतर अ‍ॅपवर शेअर करता येणार आहे. सद्यस्थितीत हे फीचर व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जनसाठी उपलब्ध आहे. व्हॉट्सअ‍ॅपचं स्टेटस फेसबुकवर शेअर करायचं असल्यास अ‍ॅन्ड्रॉईड फोनमध्ये फेसबुक किंवा फेसबुक लाईट आणि आयफोनमध्ये फेसबुक असणं गरजेचं आहे. 

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस फेसबुक स्टोरी म्हणून असं करा शेअर 

- फोनमध्ये सर्वप्रथम व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. 

- स्टेटसवर टॅप करा.

- स्टेटस अपडेट क्रिएट करा. 

- तुमचं स्टेटस नवीन आहे की जुनं यावरून समोर दोन पर्याय दिसतील. 

नवीन WhatsApp स्टेटसला असं बनवा फेसबुक स्टोरी

- सर्वप्रथम WhatsApp च्या My Status वर जा. येथे Share to Facebook वर टॅप करा.  

- Allow वर टॅप केल्यांतर समोर फेसबुक अ‍ॅप ओपन होईल. 

- फेसबुकवर तुम्हाला ज्या लोकांसोबत स्टेटस शेअर करायचं आहे ते लोक सिलेक्ट करा.  त्यानंतर Share Now वर टॅप करा. 

- हे करताना दुसरा टॅब ओपन केला तर ‘Share to Facebook Story’ चा पर्याय गायब होईल. 

facebook uploaded email contacts of almost 15 lakh user | फेसबुकचा पुन्हा

जुनं WhatsApp स्टेटसला असं बनवा फेसबुक स्टोरी 

- My Status जवळ More चा एक पर्याय मिळेल. त्यावर टॅप करा. 

- त्यानंतर तीन डॉटवर जा आणि Share to Facebook वर टॅप करा. 

- Allow वर टॅप केल्यास समोर फेसबुक ओपन होईल. 

- फेसबुकवर तुम्हाला ज्या लोकांसोबत स्टेटस शेअर करायचं आहे ते लोक सिलेक्ट करा.  त्यानंतर Share Now वर टॅप करा. 

- ही संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर WhatsApp रीओपेन होईल. 

WhatsApp चॅटींगची गंमत वाढणार, लवकरच 'हे' धमाकेदार फीचर्स येणार

WhatsApp वर असं अ‍ॅक्टिव्ह करा डार्क मोड फीचर 

 गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपच्या डार्क मोड फीचरची जोरदार चर्चा सुरू आहे. कंपनी Android Developers आणि Apple iOS Developers वर Dark Mode फीचरवर काम करत आहे. व्हॉट्सअ‍ॅप युजर्स खूप दिवसांपासून या फीचरची वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी डार्क मोड फीचरचे काही फोटो हे लीक झाले होते. मात्र हे फीचर युजर्सना कधी उपलब्ध होणार याबाबत अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. गुगल क्रोम (Google Chrome) आणि इतर काही गुगल अ‍ॅप्स (Google Apps) सोबत फेसबुक मेसेंजरने देखील आपल्या प्लॅटफॉर्मवर डार्क मोड फीचरचा समावेश केला आहे.  Android  फोनचा वापर करत असाल तर आधी तुमचा फोन  Android Q च्या बीटा व्हर्जनवर काम करत आहे का हे तपासून घ्या. अनेक Andorid Mobile फोन Android Q च्या लेटेस्ट बीटा व्हर्जनचा वापर करू शकतात. या लिस्टमध्ये गुगल पिक्सलच्या काही स्मार्टफोनचा समावेश आहे. 

1 जुलैपासून 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही WhatsApp

WhatsApp वर आवडत्या व्यक्तीने ब्लॉक केलंय? असं तपासा

व्हॉट्सअ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र व्हॉट्सअ‍ॅपवर काही कारणास्तव आपण आपल्याला नको असलेल्या व्यक्तींना ब्लॉक करू शकतो. त्या व्यक्तींना ब्लॉक केल्यावर मेसेज पाठवला अथवा रिसीव्ह केला जात नाही. तसेच चॅट म्हणजेच संवाद साधता येत नाही. एखाद्या व्यक्तीशी वाद झाला की लगेचच व्हॉट्सअ‍ॅपवर त्या व्यक्तीला ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला जातो. जोपर्यंत आपण अनब्लॉक करत नाही तोपर्यंत फोटो, व्हिडीओ, मेसेज पाठवता येत नाही. कधी कधी आपण एखादया व्यक्तीला मेसेज करतो पण तो मेसेज त्या व्यक्तीपर्यंत पोहचला आहे की नाही हे समजतच नाही. म्हणजेच त्या व्यक्तीने ब्लॉक केल्याची दाट शक्यता असते. आपल्याला कोणी ब्लॉक केलं आहे का? किंवा आवडत्या व्यक्तीने ब्लॉक केलंय का? हे तपासण्यासाठी काही ट्रिक्स आहेत. 
 

Web Title: whatsapp update how to share whatsapp status to facebook stories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.