WhatsApp युजर्सची मजा! आलं जबरदस्त फीचर; आता कधीही मिस होणार नाहीत महत्त्वाचे मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 13:56 IST2024-12-09T13:55:22+5:302024-12-09T13:56:23+5:30
WhatsApp: लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप WhatsApp आपल्या युजर्ससाठी वेळोवेळी नवनवीन अपडेट्स आणत असतं. युजर्सच्या सोयीसाठी कंपनीने पुन्हा एकदा एक नवीन फीचर आणलं आहे.

WhatsApp युजर्सची मजा! आलं जबरदस्त फीचर; आता कधीही मिस होणार नाहीत महत्त्वाचे मेसेज
लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप WhatsApp आपल्या युजर्ससाठी वेळोवेळी नवनवीन अपडेट्स आणत असतं. युजर्सच्या सोयीसाठी कंपनीने पुन्हा एकदा एक नवीन फीचर आणलं आहे. WhatsApp च्या नवीन फीचरमुळे युजर्स यापुढे महत्त्वाचे मेसेज विसरणार नाहीत. WhatsApp ने आपल्या जवळपास 4 बिलियन युजर्ससाठी एक दमदार फीचर आणलं आहे. या फीचरचं नाव मेसेज रिमाइंडर्स असं आहे, जे महत्वाचे मेसेजबद्दल माहिती देईल.
WhatsApp चे मेसेज रिमाइंडर्स फीचर युजर्सना त्या मेसेजची आठवण करून देईल जे त्यांनी अजून वाचलेले नाहीत. यापूर्वी हे रिमाइंडर फीचर फक्त स्टेटस अपडेटसाठी उपलब्ध होतं. आता हे फीचर फक्त काही युजर्ससाठी आणलं गेलं आहे. परंतु टेस्टनंतर ते सर्व युजर्ससाठी आणलं जाईल.
📝 WhatsApp beta for Android 2.24.25.29: what's new?
— WABetaInfo (@WABetaInfo) December 7, 2024
WhatsApp is rolling out a reminder notification feature for chat messages, and it's available to some beta testers!https://t.co/Ap4vjMlHQypic.twitter.com/d2rPRVrSbM
WABetainfo च्या लेटेस्ट रिपोर्टमधून खुलासा झाला आहे की, Google Play Store वर उपलब्ध लेटेस्ट WhatsApp beta for Android 2.24.25.29 update वर स्पॉट केला गेला आहे. अशा परिस्थितीत युजर्सना न वाचलेल्या मेसेजसाठी रिमाइंडरही मिळेल. WABetainfo ने या नवीन फीचरचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे.
मेसेज रिमाइंडरमध्ये, युजर्सना आता सेटिंग्जमध्ये रिमाइंडर टॉगल मिळेल. टॉगल इनेबल केल्यावर, तुम्हाला न वाचलेले मेसेज आणि WhatsApp च्या अनरिड मेसेजमध्ये मिळतील. हे टॉगल आधीही युजर्ससाठी उपलब्ध होतं. हे केवळ स्टेटस रिमाइंडरसाठी कार्य करतं. हे फीचर सुरू केल्यामुळे लोकांचे मेसेज मिस होणार नाहीत.