आता दोन फोनवर एकच WhatsApp चालणार; नवीन फीचर येतंय, असं करेल काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 16:15 IST2022-05-09T15:25:34+5:302022-05-09T16:15:42+5:30
WhatsApp : काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपने WhatsApp आपल्या सर्व यूजर्ससाठी मल्टी डिव्हाईस सपोर्ट फीचर जारी केले आहे.

आता दोन फोनवर एकच WhatsApp चालणार; नवीन फीचर येतंय, असं करेल काम
नवी दिल्ली : व्हॉट्सअॅप (WhatsApp) सध्या एका नवीन फीचरवर काम करत आहे. या फीचरला कंपेनियन मोड (Companion Mode) असे नाव दिले आहे. हे काहीसे मल्टी-डिव्हाइस फीचरसारखेच आहे, परंतु विशेष बाब म्हणजे याद्वारे एका सेकंडरी डिव्हाइसला प्रायमरी फोन सारखे कनेक्ट करू शकता. म्हणजेच, सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास तुम्ही एकाच वेळी दोन स्मार्टफोनवर एकच व्हॉट्सअॅप अकाउंट चालवू शकाल.
काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपने आपल्या सर्व यूजर्ससाठी मल्टी डिव्हाईस सपोर्ट फीचर जारी केले आहे. या फीचरद्वारे तुम्ही इतर चार डिव्हाइसवर व्हॉट्सअॅप अकाउंट वापरू शकता. मात्र, इतर डिव्हाइसवर तुम्ही फक्त व्हॉट्सअॅप वेब व्हर्जन चालवण्यास सक्षम असाल. म्हणजेच इतर फोनवर व्हॉट्सअॅप वापरणे अजूनही अवघड आहे.
WABetainfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप कंपेनियन मोड फीचरची (Companion Mode Feature) चाचणी करत आहे. याद्वारे व्हॉट्सअॅप अकाउंटसोबत एक सेकंडरी डिव्हाइसला लिंक केले जोडले जाऊ शकते. हे फीचर सर्वात पहिल्यांदा एप्रिलमध्ये पाहिले गेले होते आणि आता अधिक डिटेल्स समोर आले आहेत.
वेबसाइटने एक स्क्रीनशॉट देखील दाखविला आहे, ज्यामध्ये युजर्सला कंपेनियन मोडशी संबंधित एक चेतावणी दिली जात आहे. यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, जर तुमच्या फोनवर आधीपासूनच व्हॉट्सअॅप अकाउंट असेल आणि तुम्ही फोनला सेकंडरी डिव्हाइस म्हणून दुसर्या अकाउंटला कनेक्ट केले असेल तर चालू अकाउंट लॉग आउट होईल.