WhatsApp चे ५ दमदार फीचर्स; कलरफुल थीमसह व्हिडीओ प्लेबॅक स्पीड सेट करण्याची संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 14:09 IST2025-03-10T14:08:36+5:302025-03-10T14:09:07+5:30
WhatsApp : प्रायव्हसी आणि सिक्योरिटी आणखी चांगली होण्यासाठी WhatsApp मध्ये वेळोवेळी बदल केले जातात.

WhatsApp चे ५ दमदार फीचर्स; कलरफुल थीमसह व्हिडीओ प्लेबॅक स्पीड सेट करण्याची संधी
प्रायव्हसी आणि सिक्योरिटी आणखी चांगली होण्यासाठी WhatsApp मध्ये वेळोवेळी बदल केले जातात. याशिवाय, त्यात नवीन फीचर्स देखील जोडले जातात. प्लॅटफॉर्म प्रायव्हसी, सिक्योरिटी आणि कस्टमायझेशन मजबूत करण्यासाठी सतत स्वतःला अपडेट करत आहे. आता कंपनीने ५ नवीन दमदार फीचर्स आणण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे मेसेजिंग आणखी सोयीस्कर होईल. व्हिडीओ प्लेबॅक सुधारण्यासाठी देखील हे फीचर्स खूप उपयुक्त ठरतील.
कलरफुल थीम्सने चॅट करा कस्टमाइझ
आता WhatsApp युजर्स त्यांचे चॅटिंग आणखी पर्सनलाइज करू शकतात. पूर्वी, युजर्सकडे कमी पर्याय होते. आता WhatsApp ने २० नवीन व्हायब्रंट चॅट थीम आणि ३० नवीन वॉलपेपर जोडले आहेत. या फीचरच्या मदतीने, युजर्स त्यांच्या आवडीनुसार रंग सेट करू शकतात, ज्यामुळे चॅटिंगचा अनुभव नवीन आणि फ्रेश वाटेल.
क्लियर चॅट नोटिफिकेशन्सपासून मिळेल आराम
आता नोटिफिकेशन कस्टमाइझ करण्याचा पर्याय देखील दिला जात आहे. अनेक युजर्सना अनरीड मेसेजचं नोटिफिकेशन डॉट त्रास देतो. विशेषतः जेव्हा एकाच वेळी अनेक मेसेज येतात. आता WhatsApp ने क्लिअर चॅट नोटिफिकेशन्स फीचर सादर केलं आहे, ज्याद्वारे युजर्स स्वतः नोटिफिकेशन्स कशा दिसाव्यात हे ठरवू शकतील. याव्यतिरिक्त, तुम्हाला नको असेलल्या नोटिफिकेशन्स काढून टाकण्याचा पर्याय मिळेल.
Meta AI विजेटने AI चॅटबॉटचा इन्स्टेंट एक्सेस
WhatsApp आता एआय फीचर्स इंटीग्रेट करत आहे. युजर्स त्यांच्या होम स्क्रीनवर मेटा एआय विजेट जोडू शकतात, ज्यामुळे एआय चॅटबॉटमध्ये इन्स्टेंट एक्सेस मिळतो. हे फीचर चालू करण्यासाठी, युजर्सना Personalization > Widgets सेक्शनमध्ये जावं लागेल आणि नंतर त्यांच्या फोनच्या होम स्क्रीनवर मेटा एआय विजेट जोडावे लागेल. यानंतर, फक्त एका टॅपने एआय चॅटबॉट उघडेल आणि युजर्सना मदत करेल.
व्हिडीओ प्लेबॅक स्पीड करा एडजस्ट
WhatsApp कडे आता व्हिडीओ प्लेबॅकचा स्पीड बदलण्याचा पर्याय आहे. पूर्वी हे फीचर फक्त व्हॉइस नोट्ससाठी उपलब्ध होतं, परंतु आता युजर्स १.५x किंवा २x वेगाने व्हिडीओ देखील पाहू शकतात. हे फीचर विशेषतः मोठा व्हिडीओ लवकर पाहण्यासाठी उपयुक्त ठरेल.
अनरीड चॅट काउंटर आता चॅट फिल्टरमध्ये देखील उपलब्ध
WhatsApp ने गेल्या वर्षी चॅट फिल्टर फीचर सादर केले होते, जे मेसेजेस चांगल्या प्रकारे ऑर्गनाइज करण्यास मदत करते. आता त्यात एक नवीन अनरीड चॅट काउंटर जोडले गेलं आहे. या फीचरच्या मदतीने, युजर्सना चॅट फिल्टरमध्ये किती अनरीड मेसेज आहेत हे थेट कळेल, जेणेकरून कोणताही महत्त्वाचा मेसेज चुकणार नाही.