एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 18:42 IST2025-12-12T18:40:30+5:302025-12-12T18:42:16+5:30
जर तुम्ही WhatsApp वापरत असाल, तर येत्या काही दिवसांत तुम्हाला एकापेक्षा एक चांगले फीचर्स मिळणार आहेत.

एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
WhatsApp युजर्ससाठी कंपनीने अनेक नवीन फीचर्स आणले आहेत. जर तुम्ही WhatsApp वापरत असाल, तर येत्या काही दिवसांत तुम्हाला एकापेक्षा एक चांगले फीचर्स मिळणार आहेत. उदाहरणार्थ, जर समोरच्या व्यक्तीने तुमचा कॉल उचलला नाही, तर आता तुम्ही त्याला 'व्हॉइस किंवा व्हिडिओ नोट पाठवून कॉल उचलण्यास सांगू शकता. हे फीचर आयफोनसारखं आहे, जिथे व्हॉइस मेल पाठवण्याची सुविधा दिली जाते. याव्यतिरिक्त, ग्रुप कॉल स्पीकर आणि डेस्कटॉप युजर्ससाठी नवीन मीडिया टॅब आणला गेला आहे.
कॉल कॅटेगरीमध्ये आले ३ नवीन फीचर्स
WhatsApp ने कॉल कॅटेगरीमध्ये ३ नवीन फीचर्स सादर केले आहेत.
मिस्ड कॉल मेसेजेस - अनेकदा असं होतं की तुम्ही कोणाला कॉल केला आणि समोरची व्यक्ती तुमचा कॉल उचलू शकली नाही किंवा उत्तर देऊ शकली नाही. अशा परिस्थितीत, आता तुम्ही व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट रेकॉर्ड करून पाठवू शकाल. याचा फायदा असा होईल की जेव्हा समोरची व्यक्ती App उघडेल, तेव्हा एका टॅपमध्येच त्याला तुमचा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट मिळेल.
व्हॉइस चॅटमध्ये रिॲक्शन - आता तुम्ही व्हॉइस चॅट करत असताना थेट मेसेज चॅटमध्ये शिफ्ट होऊ शकाल. व्हॉइस चॅट दरम्यान रिॲक्ट देखील करू शकाल.
ग्रुप कॉल स्पीकर स्पॉटलाइट - यामुळे ग्रुप कॉल करणं पूर्वीपेक्षा अधिक सोयीचं होईल.

डेस्कटॉप/लॅपटॉप युजर्ससाठी नवीन मीडिया टॅब
WhatsApp कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मॅकबुकमध्ये वापरणाऱ्या युजर्सना नवीन मीडिया टॅब मिळेल. आता तुम्ही तुमचे सर्व डॉक्यूमेंट्स, लिंक्स आणि मीडिया फाइल्स चॅट्समध्ये एकाच ठिकाणी शोधू शकता. WhatsAppचं म्हणणं आहे की या फीचरमुळे Mac, Windows आणि Web वर फाइल्स शोधणं आणि काम करणे खूप जलद होईल.
स्टेटस आणि चॅनल झालं आणखी मजेशीर
WhatsApp वर लोक स्टेटस पाहण्यात बराच वेळ घालवतात. आता स्टेटस पूर्वीपेक्षाही जास्त मजेशीर होणार आहेत. आता तुम्ही तुमच्या स्टेटसवर लोकांना प्रश्न विचारू शकाल, ज्यावर लोक उत्तर देऊ शकतील. हे फीचर WhatsApp चॅनल्सवर आणलं गेलं आहे. याच्या मदतीने ग्रुप ॲडमिन त्यांच्या फॉलोअर्सशी अधिक चांगल्या प्रकारे कनेक्ट होऊ शकतील आणि त्यांना कोणत्याही विषयावर रिअल टाइम उत्तर देखील मिळेल.