अरे वा! 4 डिव्हाइसेसवरून वापरता येणार एक WhatsApp अकॉउंट; मल्टी डिवाइस फिचर सादर
By सिद्धेश जाधव | Updated: July 15, 2021 18:31 IST2021-07-15T18:30:03+5:302021-07-15T18:31:37+5:30
WhatsApp multi-device Support: मल्टी डिवाइस फिचर सध्या व्हॉट्सअॅप बीटा व्हर्जनसाठी रोलआउट करण्यात आले आहे, याची माहिती व्हॉट्सअॅपचे हेड विल कॅथकार्ट यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली आहे.

अरे वा! 4 डिव्हाइसेसवरून वापरता येणार एक WhatsApp अकॉउंट; मल्टी डिवाइस फिचर सादर
WhatsApp च्या मल्टी डिवाइसला सपोर्ट फीचर्सची वाट युजर्स आतुरतेने बघत होते आणि आता हे फिचर सादर करण्यात आले आहे. WhatsApp च्या या Multi-Device फीचरच्या मदतीने युजर्स आता एकसाथ चार वेगवेगळ्या डिवाइसवर व्हॉट्सअॅप वापरू शकतील. वेगवेगळे डिवाइस एका अकॉउंटशी लिंक झाल्यावर देखील प्रायव्हसीवर कोणताही परिणाम होणार नाही अशी माहिती व्हॉट्सअॅप हेड विल कॅथकार्ट यांनी दिली आहे. (WhatsApp is rolling out multi-device capability)
Multi-Device फीचरचे बीटा व्हर्जन रोल आउट
मल्टी डिवाइस फिचर सध्या व्हॉट्सअॅप बीटा व्हर्जनसाठी रोलआउट करण्यात आले आहे, याची माहिती व्हॉट्सअॅपचे हेड विल कॅथकार्ट यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली आहे. आता युजर फोन अॅक्टिव्ह नसतानाही व्हॉट्सअॅपच्या डेस्कटॉप किंवा वेब वर्जनाचा वापर करू शकतात. हे नवीन फीचर कंपनीने बुधवारपासून रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे.
असे लिंक करा मल्टी डिवाइस
तुमच्या मूळ फोन व्यतिरिक्त दुसऱ्या डिवाइसवर व्हॉट्सअॅप अॅक्सेस करण्यासाठी युजर्सना एक QR Code स्कॅन करावा लागेल. तसेच दुसऱ्या डिवाइसवर व्हॉट्सअॅप लिंक करण्यासाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनची देखील आवश्यकता असेल. तुम्ही मूळ डिवाइसच्या मदतीने इतर डिवाइसवरून लॉग आऊट देखील करू शकता. तसेच त्या डिवाइसवरून तुमचे अकॉउंट कधी सक्रिय होते याची माहिती तुम्हाला मिळेल. हे फिचर सध्या व्हॉट्सअॅप बीटा व्हर्जनमध्ये देण्यात आले असून लवकरच हे सर्वांसाठी उपलब्ध होऊ शकते.