मस्तच! WhatsApp वर पुन्हा येतंय 'हे' दमदार फीचर; कंपनीने वर्षभरापूर्वी केलं होतं बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 18:02 IST2023-11-27T17:54:49+5:302023-11-27T18:02:19+5:30
WhatsApp आता एक वर्षापूर्वी बंद करण्यात आलेलं एक फीचर पुन्हा लाँच करत आहे.

मस्तच! WhatsApp वर पुन्हा येतंय 'हे' दमदार फीचर; कंपनीने वर्षभरापूर्वी केलं होतं बंद
WhatsApp आपल्या युजर्सच्या चॅटिंगची गंमत वाढवण्यासाठी सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. तर काही वेळा जुने फीचर्स हे बंद केले जातात. पण यावेळी उलट होणार आहे. WhatsApp आता एक वर्षापूर्वी बंद करण्यात आलेलं एक फीचर पुन्हा लाँच करत आहे.
View Once असं WhatsApp च्या या फीचरचं नाव आहे. ज्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. या फीचरमध्ये युजर्स फोटो किंवा व्हि़डीओ पाठवू शकतात, जे एकदा पाहिल्यानंतर गायब होतात.
WhatsApp ने डेस्कटॉप युजर्ससाठी हे फीचर वर्षभरापूर्वीच बंद केलं होतं आणि आता हे फीचर पुन्हा परत येत आहे अशी माहिती समोर आली आहे. WABetainfo च्या रिपोर्टनुसार, हे फीचर काही बीटा युजर्ससाठी पुन्हा उपलब्ध आहे आणि लवकरच सर्वांसाठी जारी केलं जाऊ शकतं.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) साठी देखील लवकरच WhatsApp मध्ये सपोर्ट येणार आहे. त्याचं टेस्टिंग बीटा व्हर्जनवर केलं जात आहे. बीटा युजर्सने त्याचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.
रिपोर्टनुसार, WhatsApp चे हे नवीन अपडेट सध्या अमेरिकेतील बीटा युजर्ससाठी उपलब्ध आहे. नवीन अपडेट Android बीटा व्हर्जन 2.23.24.26 वर पाहता येईल. बीटा युजर्सना एक व्हाईट बटण दिसत आहे ज्यावर मल्टीकलर रिंग आहे.