शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp वरही घेता येणार Netflix वरच्या व्हिडीओची मजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 15:25 IST

व्हॉट्सअ‍ॅपने असंच एक फायदेशीर फीचर आणलं आहे. या फीचरचा सर्वाधिक फायदा हा Netflix युजर्सना होणार आहे.

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. यावेळीही व्हॉट्सअ‍ॅपने असंच एक फायदेशीर फीचर आणलं आहे. या फीचरचा सर्वाधिक फायदा हा Netflix युजर्सना होणार आहे. याआधी काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक फीचर आलं होतं. यामध्ये YouTube चे व्हिडीओ हे व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये दिसत होते. Picture in Picture मोडच्या माध्यमातून YouTube व्हिडीओ हा एका फ्लोटिंग विंडोमध्ये व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये प्ले होतो. अशाच पद्धतीने Netflix वरचे व्हिडीओ पाहता येणार आहेत.

WABetainfo च्या एका रिपोर्टनुसार व्हॉट्सअ‍ॅपमध्ये Netflix ला देखील सपोर्ट देण्यात येणार आहे. Netflix चे ट्रेलरचे व्हिडीओ आता थेट व्हॉट्सअ‍ॅपमध्ये प्ले होणार आहेत . जर कोणी तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर Netflix चा कंटेंट अथवा फिल्म किंवा सीरीजचा ट्रेलर पाठवला तर ते युजर्सला व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्येच पाहता येणार आहे. सध्या एखाद्या व्यक्तीने Netflix ची लिंक शेअर केली तर ती ओपन करण्यासाठी  Netflix अ‍ॅप ओपन होतं. त्यानंतर ट्रेलर पाहायला मिळतो.   

WABetainfo ने काही स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत ज्यामध्ये यूट्यूब व्हिडीओप्रमाणेच हे व्हिडीओ चॅटमध्ये प्ले होताना दिसत आहेत. यूट्यूब व्हिडीओ शिवाय इन्स्टाग्राम आणि फेसबुकचे व्हिडीओ ही व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये डायरेक्ट प्ले होतात. Netflix स्ट्रीमिंग सपोर्ट सध्या आयओएस युजर्सना देण्यात येणार आहे. कंपनी सध्या या फीचरची चाचणी करत असून लवकरच युजर्सना लवकरच हे फीचर मिळणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जनसाठी डार्क मोड फीचर जारी करण्यात आले आहे. 

गुगलप्रमाणे आता Whatsapp वरही हवं ते सर्च करा; कसं ते जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅपवरही गुगलप्रमाणेच हवं ते सर्च करता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर हा सध्या मोठ्या प्रमाणात केला जातो. व्हॉट्सअ‍ॅप संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे.  व्हॉट्सअ‍ॅपही आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. आता व्हॉट्सअ‍ॅप  युजर्सनाही गोष्टी सर्च करता येणार आहे. युजर्स व्हॉट्सअ‍ॅप बोटच्या (Whatsapp Bot) माध्यमातून हे अ‍ॅप सर्च इंजिनमध्ये बदलू शकतात. या फीचरच्या मदतीने युजर्स खेळ, मनोरंजन, टेक, बातम्या यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी सर्च करू शकतात. व्हॉट्सअ‍ॅप गुगल सर्च इंजिनमध्ये बदलण्यासाठी युजर्सना काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

काय सांगता? 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही WhatsApp

WhatsApp कमाल करणार; चॅट आपोआपच गायब होणार

व्हॉट्सअ‍ॅपच्या फीचरवर लक्ष ठेवणारी साईट WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकच्या मालकीची कंपनी व्हॉट्सअ‍ॅप एका अशा भन्नाट फिचरवर काम करत आहे की, पाठविलेला मॅसेज किती वेळ दिसेल याची वेळ पाठवणाऱ्याला ठरवता येणार आहे. म्हणजेच एखाद्याने मेसेज केला तर त्या मेसेजचे आयुष्य ठरवता येणार आहे. ही वेळ संपल्यानंतर चॅट आपोआप डिलीट होणार आहे. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये डिसअ‍ॅपीअर्ड हे फीचर देण्यात येणार आहे. हे सिलेक्ट केल्यावर सर्व चॅट गायब होणार आहे. हे फीचर आधीपासूनच टेलिग्राम अ‍ॅपवर आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या पाठविलेले मेसेज पाठवणाऱ्याकडून डिलीट करता येतात. यावेळी मेसेज डिलिटेड असे दिसते. परंतू नव्या फिचरमध्ये हे दिसणार नाही. टाईम एक्स्पायर असे दिसण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइलNetflixनेटफ्लिक्स