WhatsApp Feature: WhatsApp चे पेमेंट बॅकग्राऊंड्स फीचर भारतात सादर; आता बॅकग्राउंडसह पाठवा पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 17:10 IST2021-08-17T17:10:14+5:302021-08-17T17:10:41+5:30
WhatsApp New Feature: WhatsApp ने Payments Backgrounds फीचर भारतात सादर केले आहे. हे फिचर अँड्रॉइड आणि आयफोन्स दोन्ही प्लॅटफॉर्मवरून वापरता येईल.

WhatsApp Feature: WhatsApp चे पेमेंट बॅकग्राऊंड्स फीचर भारतात सादर; आता बॅकग्राउंडसह पाठवा पैसे
WhatsApp ने भारतात मनी ट्रांसफर सेगमेंटमध्ये नवीन फिचर जोडले आहेत. या फिचरचे नाव Payments Backgrounds असे आहे. युजर्सना केलेल्या पेमेंट्सचा पर्सनल टच देता यावा म्हणून व्हॉट्सअॅपने हे फिचर आणले आहे. या फीचरमुळे व्हॉट्सअॅप पेमेंट्सवरून मित्र आणि कुटुंबियांना पैसे पाठवताना तुम्ही आता एक साजेशा बॅकग्राउंड निवडू शकता. हे फिचर अँड्रॉइड आणि आयओएस अश्या दोन्ही प्लॅटफॉर्मवरून वापरता येईल.
पैश्यांसोबत भावनाही पाठवता याव्या म्हणून व्हॉट्सअॅपने हे फिचर सादर केल्याचे कंपनीने सांगितले आहे. सध्या व्हॉट्सअॅपवर सात बॅकग्राउंड उपलब्ध आहेत. यात हॉलिडे, बर्थडे आणि ट्रॅव्हलिंग इत्यादी प्रसंगी वापरता येतील अश्या बॅकग्राऊंडचा समावेश आहे. तसेच रक्षाबंधनसारखे थीम-बेस्ड बॅकग्राउंड देखील बघायला मिळतील. ज्यांना वापर तुम्ही 22 तारखेला येणाऱ्या रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी करू शकता.
व्हॉट्सअॅपवर Payment Background चा वापर कसा करायचा
WhatsApp वर नवीन पेमेंट करताना पेमेंट बॅकग्राउंड निवडण्यासाठी ‘Send Payment’ स्क्रीनवर बॅकग्राउंड आयकॉनवर टॅप करा. तुमच्यासमोर बॅकग्राऊंडची यादी येईल, त्यातून पेमेंटला साजेश्या बॅकग्राऊंडची निवड करा. बॅकग्राउंड सोबतच तुम्ही तुम्ही पेमेंटचे कारण किंवा शुभेच्छा लिहू शकता. त्यानंतर पेमेंट केल्यावर रिसिव्हरला पेमेंट बॅकग्राउंडसह मिळेल.