WhatsApp मधील डिलीट केलेल्या मीडिया फाइल्स अशा प्रकारे रिस्टोअर करा, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 20:04 IST2022-12-12T20:02:56+5:302022-12-12T20:04:07+5:30
WhatsApp मेसेंजिंग अॅप नेहमी बदल करत असते, या अॅपचा ऑफिससाठी देखील याचा वापर केला जातो.

WhatsApp मधील डिलीट केलेल्या मीडिया फाइल्स अशा प्रकारे रिस्टोअर करा, जाणून घ्या
WhatsApp मेसेंजिंग अॅप नेहमी बदल करत असते, या अॅपचा ऑफिससाठी देखील याचा वापर केला जातो. मजकुराव्यतिरिक्त, आपल्याला व्हॉट्सअॅपवर फोटो आणि व्हिडिओ देखील पाठवतात. यात अनेकवेळा स्टोरेज फुल होते, आणि स्टोरेज कमी करण्यासाठी मोकळे करण्यासाठी फोटो, व्हिडिओ काढून टाकले जातात. जर तुम्ही चुकून फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले असतील तर आम्ही तुम्हाला ते रिस्टोअर करण्याचा मार्ग सांगणार आहोत.
सध्या WhatsApp मध्ये मीडिया फाइल्स पुनर्प्राप्त करण्याचा कोणताही थेट पर्याय नाही. पण, यात अजून एक ट्रीक आहे, ज्याद्वारे फोटो आणि व्हिडिओ पुन्हा रिस्टोर केले जाऊ शकतात.
WhatsApp बाय डिफॉल्ट फोनच्या गॅलरीत सर्व फोटो आणि व्हिडिओ सेव्ह करते. तुम्ही एखाद्याला व्हिडिओ किंवा फोटो पाठवला असेल आणि तो चॅटमधून डिलीट केला असेल तरीही, फोटो डिव्हाइस गॅलरीत सेव्ह केले जातात.
WhatsApp Android मधील Google Drive आणि iOS वापरकर्त्यांसाठी iCloud वर मीडिया फाइल्सचा बॅकअप घेतो. यात जर रोजचा बॅकअप नंतर मीडिया हटवला गेला तर, तुम्ही Google ड्राइव्ह किंवा iCloud वरून मीडिया फाइल्स पुनर्प्राप्त करू शकता.
बॅकअपमधून पुन्हा ते मिळवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा व्हॉट्सअॅप अनइंस्टॉल करावे लागेल. यानंतर तोच फोन नंबर सेट करावा लागेल.
यानंतर, सेटअप दरम्यान, बॅकअपमधून डेटा पुन्हा घेण्यासाठी बॅकअप करण्याचा पर्याय असेल. तुम्हाला ते स्वीकारावे लागेल.
सेटअप पूर्ण झाल्यानंतर, बॅकअपमधील तुमच्या मीडिया फाइल्स डिव्हाइसवर सेव केल्या जातील.
फक्त Android वापरकर्त्यांना मीडिया फोल्डरमधून WhatsApp मीडिया बॅकअपचा पर्याय मिळतो. यासाठी पहिल्यांदा फाईल एक्सप्लोरर अॅप ओपन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला रूट डिरेक्टरीमधून व्हॉट्सअॅप फोल्डरमध्ये जावे लागेल. यानंतर, तुम्हाला मीडिया फोल्डर आणि WhatsApp इमेज फोल्डरमध्ये जावे लागेल. तुम्हाला रिस्टोअर झालेले फोटो दिसतील. यानंतर, तुम्ही पाठवलेल्या फोल्डरमध्ये जाऊन डिलीट केलेले फोटो पाहू शकाल.