व्हॉट्सअॅप झाले बंद, जगभरात उडाला गोंधळ  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 02:31 PM2017-11-03T14:31:55+5:302017-11-03T16:04:27+5:30

आज (दि. 3) दुपारी अचानक व्हॉट्सअॅप क्रॅश झाले आहे. सुरुवातीला इंटरनेट सेवेतील व्यत्यय किंवा मोबाइलमध्ये काही बिघाड झाल्याने असे झाले असावे, असे सगळ्यांना वाटले, पण नंतर संपूर्ण जगभरातील व्हॉट्सअॅपची सेवा क्रॅश झाल्याचे वृत्त

Whatsapp crashed leaving millions frustrated | व्हॉट्सअॅप झाले बंद, जगभरात उडाला गोंधळ  

व्हॉट्सअॅप झाले बंद, जगभरात उडाला गोंधळ  

Next

मुंबई - अगदी साध्या चॅटिंगपासून ते तातडीने महत्त्वाचा मेसेज देण्यापर्यत व्हॉट्सअॅप हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. त्यामुळे सध्याच्या काळात व्हॉट्सअॅपविना मिनिटभर राहण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. पण आज (दि. 3) दुपारी अचानक व्हॉट्सअॅप क्रॅश झाले होते. जवळपास 40 मिनिट व्हॉट्सअॅपची सेवा बंद होती.  सुरुवातीला इंटरनेट सेवेतील व्यत्यय किंवा मोबाइलमध्ये काही बिघाड झाल्याने असे झाले असावे, असे सगळ्यांना वाटले, पण नंतर संपूर्ण जगभरातील व्हॉट्सअॅपची सेवा क्रॅश झाल्याचे वृत्त येऊ लागले.  काही वेळानंतर #whatsappdown असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड झाला आणि व्हॉट्सअॅप ठप्प झाल्याचा उलगडा झाला.  संदेशवहनाचे महत्त्वाचे साधन बनलेले व्हॉटसअॅप क्रॅश झाल्याने  जगभरात गोंधळ उडाला होता. भारतात आज दुपारी अंदाजे 2 वाजेपासून व्हॉट्सअॅप बंद झालं होतं.  
दुपारपासून  व्हॉट्सअॅपवर मेसेज येणे बंद झाले. सुरुवातीला हा काय प्रकार आहे हे कुणालाच कळेना. भारताबरोबरच इतर देशांमध्येही ही समस्या दिसून आली. इतर देशांमध्येही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ही सेवा हॅक तर झाली नाही ना अशी भीतीही व्यक्त होऊ लागली होती. पण जवळपास 40 मिनिटांनंतर व्हॉट्सअॅप पूर्ववत झालं. व्हॉट्सअॅप बंद पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी सप्टेंबरमध्येही अशाच प्रकारे व्हॉट्सअॅप ठप्प झाले होते.

Web Title: Whatsapp crashed leaving millions frustrated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.