अरे व्वा! WhatsApp वर फक्त एका क्लिकने लॉक होईल तुमचं सीक्रेट चॅट; 'ही' आहे सिंपल ट्रिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 12:17 IST2024-12-24T12:17:27+5:302024-12-24T12:17:50+5:30
WhatsApp : WhatsApp एक लोकप्रिय मेसेजिंग ॲप आहे आणि जवळजवळ सर्व वयोगटातील लोक त्याचा वापर करतात. अनेक युजर्स त्यांचे सीक्रेट चॅट इतरांपासून लपवून ठेवू इच्छितात.

अरे व्वा! WhatsApp वर फक्त एका क्लिकने लॉक होईल तुमचं सीक्रेट चॅट; 'ही' आहे सिंपल ट्रिक
WhatsApp एक लोकप्रिय मेसेजिंग ॲप आहे आणि जवळजवळ सर्व वयोगटातील लोक त्याचा वापर करतात. अनेक युजर्स त्यांचे सीक्रेट चॅट इतरांपासून लपवून ठेवू इच्छितात. इतर कोणालाही त्याबाबत समजू नये किंवा त्यांनी मेसेज वाचू नये असं वाटतं. WhatsApp च्या अशाच एका सीक्रेट फीचरबद्दल जाणून घेऊया. ज्याच्या मदतीने तुम्ही चॅट सहज लॉक करू शकता.
चॅट लॉक करण्यासाठी तुम्हाला WhatsApp ओपन करावे लागेल. यानंतर तुम्ही तुमचं कोणतंही चॅट लॉक करू शकता. तुम्हाला लॉक करू इच्छित असलेल्या तुमच्या सीक्रेट चॅटवर क्लिक करा. यानंतर प्रोफाईलच्या नावावर क्लिक करा. एक नवीन मेनू ओपन होईल, तो खाली स्क्रोल करा.
खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला चॅट लॉकचा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करा. यानंतर चॅट लॉक होईल. मात्र लक्षात ठेवा की, चॅट लॉकसाठी तुमच्या डिव्हाईसमध्ये फिंगरप्रिंट लॉक, पॅटर्न लॉक आणि फेस लॉक इत्यादी एक्टिव्ह असणं अत्यंत आवश्यक आहे. अशाप्रकारे तुमचं सीक्रेट चॅट हे तुमच्याशिवाय कोणीच ओपन करू शकणार नाही.
मोठा झटका! १ जानेवारीपासून 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही WhatsApp; 'हे' आहे कारण
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच लाखो अँड्रॉइड फोन्सवर WhatsApp काम करणं बंद करणार आहे. मेटाच्या मालकीचं हे ॲप जुनी ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या अँड्रॉइड फोनचा सपोर्ट बंद करणारा आहे. हे जवळजवळ प्रत्येक वर्षी घडतं, जेव्हा WhatsApp जुन्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी सपोर्ट करणं बंद करतं. नवीन फीचर्स जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करत नाहीत आणि काहीवेळा हे सुरक्षिततेच्या कारणास्तव केले जाते.
तुम्ही अजूनही अँड्रॉइडचं किटकॅट व्हर्जन वापरत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. दहा वर्षांपूर्वी आलेल्या या व्हर्जनवर WhatsApp आपला सपोर्ट बंद करणार आहे. याचा अर्थ १ जानेवारी २०२५ नंतर WhatsApp किटकॅट व्हर्जनवर असलेल्या फोनवर चालू शकणार नाही. तुम्हाला हे करणं थांबवायचं असल्यास, तुम्हाला तुमची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करावी लागेल किंवा नवीन फोन घ्यावा लागेल.