WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअॅप आणतंय नवीन फिचर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 19:02 IST2025-07-29T19:00:25+5:302025-07-29T19:02:23+5:30
व्हॉट्सअॅपच्या कॅमेऱ्या क्वालिटीत आणखी सुधारणा व्हायरला पाहिजे, अशी इच्छा असलेल्या वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअॅप आणतंय नवीन फिचर!
व्हॉट्सअॅपच्या कॅमेऱ्या क्वालिटीत आणखी सुधारणा व्हायरला पाहिजे, अशी इच्छा असलेल्या वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन फीचर घेऊन येत आहे. नाइड मोड असे, या फीचरचे नाव आहे. या फीचरमुळे वारकर्त्यांना कमी प्रकाशातही चांगल्या क्वालिटीचा फोटो काढता येणार आहे. हे फिच सध्या अँड्रॉईंड व्हर्जन २.२५.२२.२ च्या बीटा टेस्टर्ससाठी सुरु करण्यात आले आहेत.
WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, काही बीटा वापरकर्त्याला व्हॉट्सअॅपच्या इनबिल्ट कॅमेऱ्यांत चंद्रासारखा आयकॉन दिसेल. कमी प्रकाशात फोटो काढताना या आयकॉनवर क्लिक केल्यास व्हॉट्सअॅप स्वत:च फोटोची क्वालिटी सुधारेल. या फिचरमुळे तुम्हाला अंधारात फोटो काढताना मोठा फायदा होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, फोटो काढण्यापूर्वी नाइड मोड फीचर अॅक्टिव्ह केल्यानंतर कमी प्रकाशात चांगल्या क्वालिटीचा फोटोचा अनुभव मिळेल.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपमध्ये ग्राहकांना असे एक फिचर मिळणार आहे, ज्यामुळे वापरकर्ते इंस्टाग्राम किंवा फेसबूक वरून थेट आपले प्रोफाईल फोटो इम्पोर्ट करू शकतील. लवकरच व्हॉट्सअॅपमध्ये फोटो बदलण्यासाठी कॅमेरा, गॅलरी, अवतार किंवा एआय जनरेटेड इमेजचे ऑप्शन मिळणार आहेत. नवे फिचर आल्यानंतर इन्स्टाग्राम आणि फेसबुकचे ऑप्शन देखील जोडले जाणार आहे.