आजचा दिवस डाऊनचा! युपीआयनंतर आता व्हॉट्सअप पण बराच वेळ बंद; ग्रुपवर मेसेज जाईनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 20:50 IST2025-04-12T20:50:02+5:302025-04-12T20:50:16+5:30
दिवसभर त्यामुळे नेटकरी त्रासलेले असताना आता व्हॉट्सअप बंद पडले आहे.

आजचा दिवस डाऊनचा! युपीआयनंतर आता व्हॉट्सअप पण बराच वेळ बंद; ग्रुपवर मेसेज जाईनात
युपीआय २ लाँच झाल्यानंतर २० दिवसांत आज तिसऱ्यांदा युपीआय पेमेंट सिस्टीम डाऊन होती. दिवसभर त्यामुळे नेटकरी त्रासलेले असताना आता व्हॉट्सअप बंद पडले आहे.
१२ एप्रिल रोजी सायंकाळी ५.२२ वाजल्यापासून अनेक युजर्सचे मेसेज ग्रुपवर जात नव्हते. अनेकांना आता रात्री ८.४० वाजताही समस्या येत आहे. सायंकाळी पुन्हा सुरळीत झालेले व्हॉट्सअप पुन्हा ८ च्या सुमारास बंद पडले होते. डाऊन डिटेक्टरनी देखील ही माहिती दिली आहे.
संध्याकाळपर्यंत किमान ५९७ तक्रारी नोंद झाल्याचे डाऊन डिटेक्टरने म्हटले आहे. ८५% तक्रारी मेसेजिंग समस्यांशी संबंधित होत्या. व्हॉट्सअप बंद पडलेल्या लोकांनी सोशल मीडियावर तक्रारी सुरु केल्या आहेत. तसेच मीमही व्हायरल होत आहेत. स्टेटसही अपलोड होण्यास वेळ लागत आहे. काहींनी अॅपच काम करत नसल्याचे म्हटले आहे.
मेटाने कोणतीही अधिकृत माहिती जारी केलेली नाही. फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरणाऱ्यांनाही या समस्या येत होत्या. या सर्वांची मुळ कंपनी मेटा आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस देखील जागतिक स्तरावर ही अॅप बंद पडली होती. व्हॉट्सअॅप वेब, मेसेजिंग आणि कॉलिंग सेवांवर परिणाम झाला. त्या घटनेदरम्यान, डाउनडिटेक्टरने दिलेल्या वृत्तानुसार, ९,००० हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या.
आज भारतातील युपीआय सिस्टीमही बंद पडली होती, अनेकांच्या खात्यातून पैसे कापले गेले होते परंतू ते समोरच्याला जात नव्हते. पेमेंट फेल झाल्याचे मेसेज दिसत होते. यामुळे बहुतांश व्यवहार ठप्प झाले होते. हे होत नाही तोच आता व्हॉट्सअप दोनवेळा बंद पडल्याने युजर्स त्रस्त झाले आहेत. पर्सनल मेसेज जात होते.