‘स्टुडिओ घिबली’ काय आहे? कुठून, कसं आलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 07:48 IST2025-04-03T07:48:18+5:302025-04-03T07:48:33+5:30

Studio Ghibli: जपानमधल्या टोकियो या शहरात कागानेई या भागात स्टुडिओ घिबली हा ॲनिमेशन स्टुडिओ आहे. हायाओ मियाझाकी हे या स्टुडिओचे संस्थापक आहेत. या स्टुडिओची स्थापना जून १९८५ मध्ये झाली. मियाझाकी आणि स्टुडिओ घिबली ही दोन्ही ॲनिमेशन इंडस्ट्रीतली महत्त्वाची नावं आहेत. 

What is 'Studio Ghibli'? Where did it come from and how did it come about? | ‘स्टुडिओ घिबली’ काय आहे? कुठून, कसं आलं?

‘स्टुडिओ घिबली’ काय आहे? कुठून, कसं आलं?

स्टुडिओ घिबली - सोशल मीडियावर सतत नवनवीन ट्रेंड्स येत असतात. गेले काही दिवस फेसबुक, इन्स्टाग्रामवर घिबली इमेजेस शेअर करण्याचा ट्रेंड आला आहे. अनेक जण आपले फोटो घिबली शैलीतल्या ॲनिमेटेड रूपात बदलून ते शेअर करीत आहेत. आपले फोटो घिबली ट्रेंडमध्ये कसे कन्व्हर्ट करायचे हे सांगणारे रील्स, ब्लॉग्ज हेही त्यामुळे ट्रेंडिंग आहेत. साहजिकच हे घिबली नक्की काय आहे त्याचा शोधही घेतला जातोय. जपानमधल्या टोकियो या शहरात कागानेई या भागात स्टुडिओ घिबली हा ॲनिमेशन स्टुडिओ आहे. हायाओ मियाझाकी हे या स्टुडिओचे संस्थापक आहेत. या स्टुडिओची स्थापना जून १९८५ मध्ये झाली. मियाझाकी आणि स्टुडिओ घिबली ही दोन्ही ॲनिमेशन इंडस्ट्रीतली महत्त्वाची नावं आहेत. 

शॉर्ट फिल्म्स, टीव्ही कमर्शिअल्स आणि टेलिफिल्म्स अशा स्वरूपात स्टुडिओ घिबलीचं काम आहे. त्या कामाला आतापर्यंत अनेक महत्त्वाचे पुरस्कारही मिळाले आहेत. स्टुडिओ घिबली हे नाव मियाझाकी यांनी त्यांच्या विमानप्रेमातून निवडलं. घिबली हे एका इटालियन विमानाचं टोपण नाव आहे. विमान जसं आकाशात उंच भरारी घेतं तसंच ॲनिमेशनच्या अवकाशात उंच भरारी घेणारी एक नवी लाट म्हणून मियाझाकींनी आपल्या स्टुडिओसाठी घिबली हे नाव निवडलं. 

हातांनी चितारलेली आणि वॉटर कलर, ॲक्रेलिक कलर्सनी रंगविलेली चित्रं ही स्टुडिओ घिबलीची खासियत. आजही स्टुडिओ घिबली आपल्या ॲनिमेशन कलाकृती साकारताना हीच पारंपरिक पद्धत वापरण्याचा प्रयत्न करतात आणि कॉम्प्युटराइज ॲनिमेशन फार क्वचित वापरण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. 

आपले फोटो आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने स्टुडिओ घिबली शैलीत रूपांतरीत करून ते सोशल मीडियावर शेअर करण्याचा ट्रेंड गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे, मात्र हे अनैतिक असल्याची चर्चा मियाझाकी आणि स्टुडिओ घिबलीच्या चाहत्यांमध्ये आहे.

Web Title: What is 'Studio Ghibli'? Where did it come from and how did it come about?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.