शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

मोफत बघा ‘पेट पुराण’ आणि ‘कोण होणार करोडपती’; ‘वी’ नं सादर केला सोनीलिव प्रीमियम अ‍ॅड-ऑन पॅक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 17:37 IST

युजर्स टीव्ही आणि मोबाईलवर आपला आवडीचा कन्टेन्ट बिन्ज-वॉच करण्याची मजा घेऊ शकतात. 

आपल्या युजर्सना बिन्ज अनुभव अगदी निश्चिन्तपणे मिळवता यावा यासाठी आघाडीची टेलिकॉम ऑपरेटर वी ने आपल्या पोस्टपेड युजर्ससाठी सोनीलिव प्रीमियम अ‍ॅड-ऑन पॅक पर्याय आजपासून सुरु केला आहे. नवीन पोस्टपेड स्पेशल पॅकमध्ये दर महिन्याला फक्त १०० रुपयांच्या सबस्क्रिप्शन फीमध्ये ३० दिवस सोनीलिव प्रीमियम कन्टेन्ट पाहण्याची सुविधा आणि १० जीबी निःशुल्क डेटा दिला जात आहे. ही सबस्क्रिप्शन फी युजर्सच्या पोस्टपेड बिलामध्ये जोडली जाते. आता वीचे पोस्टपेड युजर्स त्यांचे आवडते सिनेमे, शो, खेळांच्या सामान्यांचे थेट प्रक्षेपण, एक्सक्लुसिव्ह कन्टेन्ट आणि इतर बऱ्याच मनोरंजनाचा आनंद मोबाईल व टीव्ही दोन्हींवर घेऊ शकतील. 

सोनीलिववर वेगवेगळ्या वयोगटातील, वेगवेगळ्या आवडीनिवडी असलेल्या व्यक्तींना रुचेल असा भरगच्च आकर्षक कन्टेन्ट उपलब्ध आहे. यामध्ये युईएफए चॅम्पियन्स लीग, डब्ल्यूडब्ल्यूई, बंडेसलिगा, यूएफसी यासारख्या खेळांच्या स्पर्धांपासून स्कॅम १९९२ - द हर्षद मेहता स्टोरी, महारानी, तब्बर, रॉकेट बॉईज,  गुल्लक सीझन ३ यासारखे ओरिजिनल शो, सॅल्यूट, कानेक्काने, पेट पुराण, कोण होणार करोडपती, शांतीत क्रांती आणि जेम्स सारखे क्षेत्रीय शो, द गुड डॉक्टर, फँटसी आयलंड आणि मॅगपी मर्डर्स सारखे आंतरराष्ट्रीय शो यांचा समावेश आहे. 

याबरोबरीनेच ‘वी’ने आपल्या ग्राहकांसाठी ‘वी’ अ‍ॅपवर वी मुव्हीज अँड टीव्हीवर (व्हीएमटीव्ही) आकर्षक कन्टेन्टचा भरपूर मोठा, वैविध्यपूर्ण साठा उपलब्ध करवून दिला आहे. व्हीएमटीव्ही अ‍ॅपवर ४५०  पेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनेल्स, लाईव्ह न्यूज चॅनेल्स तसेच इतर ओटीटी अ‍ॅप्सवरील प्रीमियम कन्टेन्ट पाहता येतो.   

टॅग्स :Vodafoneव्होडाफोन