55 इंचाच्या 4K Smart TV वर मिळतोय जबराट डिस्काउंट; कमी किंमतीत मिळवा प्रीमियम अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 13:27 IST2022-02-02T13:27:21+5:302022-02-02T13:27:48+5:30
4K Smart TV: Vu Premium च्या 55 इंचाच्या 4K LED Smart Android TV वर चांगला डिस्काउंट Flipkart देत आहे.

55 इंचाच्या 4K Smart TV वर मिळतोय जबराट डिस्काउंट; कमी किंमतीत मिळवा प्रीमियम अनुभव
Flipkart वर अधून मधून चांगल्या ऑफर्स येत असतात. अशीच एक ऑफर Vu च्या 4K Smart TV देखील मिळत आहे. या ऑफर अंतर्गत कंपनीचा 55-इंचाचा प्रीमियम टीव्ही स्वस्तात विकत घेता येतो. जर तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही विकत घेण्याचा विचार करत असाल तर हा एक चांगला पर्याय ठरवू शकता. 75,000 रुपयांचा हा टीव्ही 28,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Vu Premium 55 inch 4K LED Smart Android TV
या टीव्हीची मूळ किंमत 75,000 रुपये आहे. यावर फ्लिपकार्ट 46 टक्के डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे हा टीव्ही फक्त 39,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सोबत फ्लिपकार्ट अॅक्सिस क्रेडिट कार्डवर 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक देण्यात येईल. तसेच जुना टीव्ही एक्सचेंज करून 11,000 रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. योग्य टीव्ही एक्सचेंज केल्यास हा टीव्ही फक्त 28,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Vu Premium 55 inch 4K LED Smart Android TV चे स्पेसिफिकेशन्स
हा 55 इंचाचा मोठा डिस्प्ले असलेला हा टीव्ही 4K रेजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो, त्यामुळे स्मूद पिक्चर क्वॉलिटी मिळते. हा टीव्ही 30W आऊटपुट देणारे स्पीकर देण्यात आले आहेत. हा एक अँड्रॉइड टीव्ही असल्यामुळे यात गुगल असिस्टंट आणि क्रोम कास्ट सपोर्ट मिळतो. तसेच या टीव्हीवर Netflix, Prime Video, Disney+Hotstar आणि Youtube सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मची मजा घेता येते.
हे देखील वाचा: