मुंबई : स्मार्टफोन कंपन्या नुकत्याच लाँच केलेल्या मोबाईलच्या रंगांमध्ये बदल करून नवीन व्हेरिअंट लाँच करत आहेत. OnePlusने नुकतेच पर्पल रंगामध्ये व्हेरिअंट लाँच केले होते. आता चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने देखील तीन महिन्यांपूर्वीच लाँच केलेल्या Vivo V11 Pro चा नवीन कलर व्हेरिअंट लाँच केला आहे. सुपरनोवा रेड असा हा रंग असून किंमत मात्र तेवढीच ठेवली आहे.
या फोनला अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम मॉलसह रिटेल स्टोअर्समध्येही खरेदी करता येऊ शकते. Vivo V11 Pro हा फोन तीन महिन्यांपूर्वीच दोन रंगामध्ये स्टारी नाइट ब्लॅक आणि डॅजलिंग गोल्ड या रंगांमध्ये लाँच करण्यात आले होते. नव्या व्हेरिअंटमध्ये रेड आणि ब्लॅक असा मिश्र रंग देण्यात आला आहे.
Vivo V11 Pro Review : कशासाठी घ्याल? कॅमेरा की ड्रॉप नॉच, इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसाठी
Vivo V11 Pro या स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा ड्रॉप नॉच डिस्प्ले आहे जो ओप्पोच्या F9 pro मध्ये आहे. तसेच डिस्प्लेवरच फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. हा डिस्प्ले सुपर अॅमोल्ड असून अशा प्रकारचा डिस्प्ले आधी सॅमसंमगच्या मोबाईलमध्ये येत होता. या मोबाईलमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 गीगाहट्झचा ऑक्टाकोअर प्रोसेसर देण्यात आला आहे.