शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ChatGPT वापरताय? चुकूनही विचारू नका 'हे' ५ प्रश्न, अन्यथा थेट पोलीस कोठडीची हवा खावी लागेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 13:48 IST

तुम्ही या चॅटबॉट्सना काय विचारता आणि कोणती माहिती शेअर करता, यावर तुमचे संरक्षण अवलंबून आहे.

सध्या सगळीकडे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच AI ची चर्चा आहे. ऑफिसचे काम असो, मुलांचा अभ्यास किंवा कोडिंग, प्रत्येक गोष्टीसाठी लोक ChatGPTचा आधार घेत आहेत. यात शंका नाही की हे टूल खूप कामाचे आहे, पण तंत्रज्ञानाचा हा स्मार्ट मित्र कधी व्हिलन ठरेल सांगता येत नाही. तुम्ही या चॅटबॉट्सना काय विचारता आणि कोणती माहिती शेअर करता, यावर तुमचे संरक्षण अवलंबून आहे. जर तुम्ही ५ ठराविक प्रकारचे प्रश्न विचारले, तर तुमची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते किंवा तुम्ही कायदेशीर कचाट्यात अडकू शकता.

१. तुमची 'खाजगी कुंडली' मांडू नका!

कधीही चुकून सुद्धा ChatGPT सोबत तुमचे बँक डिटेल्स, आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड, पासवर्ड किंवा ओटीपी शेअर करू नका. लक्षात ठेवा, तुम्ही दिलेली माहिती एआयच्या डेटाबेसमध्ये सेव्ह होऊ शकते. जर हा डेटा लीक झाला, तर तुमचे बँक खाते क्षणात रिकामे होऊ शकते.

२. गुन्हेगारी किंवा हॅकिंगचे विचार महागात पडतील

जर तुम्ही गंमत म्हणून जरी एआयला 'बॉम्ब कसा बनवायचा?' किंवा 'एखादे अकाऊंट हॅक कसे करायचे?' असे प्रश्न विचारले, तर तुम्ही सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर येऊ शकता. बेकायदेशीर कृत्यांशी संबंधित प्रश्न विचारल्यास तुमचे अकाऊंट बॅन होऊ शकते आणि पोलीस कारवाईची टांगती तलवारही तुमच्यावर राहील.

३. डॉक्टर म्हणून एआय नको!

अनेकदा लोक आजाराची लक्षणे सांगून एआयला औषध विचारतात. एआय तुम्हाला सामान्य माहिती देऊ शकते, पण ते डॉक्टर नाही. चुकीचे औषध किंवा उपचार तुमच्या जीवावर बेतू शकतात. गंभीर आजारासाठी नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांचाच सल्ला घ्यावा.

४. अफवा पसरवणे पडेल महागात

एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा घटनेबद्दल खोटी माहिती तयार करण्यास सांगणे हा गुन्हा ठरू शकतो. समाजात द्वेष निर्माण होईल किंवा अफवा पसरतील असा मजकूर एआय कडून लिहून घेणे तुम्हाला कायदेशीर संकटात टाकू शकते.

५. दुसऱ्याच्या खासगी आयुष्यात डोकावणे टाळा

दुसऱ्या व्यक्तीचा मोबाईल नंबर, पत्ता किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणे हे प्रायव्हसी कायद्याचे उल्लंघन आहे. अशा प्रकारची अनैतिक कृत्ये तुम्हाला 'डेंजर झोन' मध्ये नेऊ शकतात.

कसा करावा सुरक्षित वापर?

तंत्रज्ञानाचा वापर हा प्रगतीसाठी असावा, संकटासाठी नाही. ChatGPT वापरताना नेहमी सतर्क राहा. फक्त शैक्षणिक, व्यावसायिक आणि सामान्य माहितीसाठीच याचा वापर करणे हिताचे आहे. तुमची एक चूक तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : ChatGPT Use: Avoid These 5 Questions to Stay Out of Jail!

Web Summary : Using ChatGPT? Don't share personal info or ask about illegal activities. Avoid seeking medical advice or spreading rumors. Respect privacy laws to prevent legal trouble.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स