शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
5
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
6
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
7
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
8
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
9
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
10
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
11
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
12
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
13
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
14
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
15
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
16
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
18
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
19
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
20
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!

खरंच की काय? Google Search मध्ये दिसतोय तुमचा नंबर अन् WhatsApp प्रोफाईल; खासगी ग्रुप झाले सार्वजनिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 11:23 IST

Google Search And WhatsApp : काही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि प्रोफाईल गुगल सर्चमध्ये दिसत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नवी दिल्ली - गेल्या वर्षी फेब्रुवारीत Google आणि WhatsApp ची जोरदार चर्चा सुरू झाली होती. काही पब्लिक ग्रुप हे गुगल सर्चच्या रिझल्टमध्ये दिसत असल्याची त्याची चर्चा रंगली होती. या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील चॅट आणि मेंबर इन्फो ही गुगल सर्चमध्ये पाहिली गेली होती. मात्र ही समस्या त्यानंतर दूर करण्यात आली होती. तसेच ग्रुप सुद्धा लपवण्यात आले होते. पण आता पुन्हा एकदा काही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि प्रोफाईल गुगल सर्चमध्ये दिसत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. Gadgets 360 सोबत चर्चा करताना सायबर सिक्योरिटी रिसर्चर राजशेखर राजसहरिया यांनी याबाबत माहिती दिली आहे.

युजर्सचा फोन नंबर आणि प्रोफाईल पिक्चर सुद्धा यावेळी गुगल सर्चमध्ये दिसत आहे. म्हणजेच गेल्यावेळेपेक्षा ही स्थिती चिंताजनक आहे. जर कोणाकडे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची यूआरएल असेल तर गुगलवर याला सर्च करून जॉइन करू शकतात. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, युजर्स लिंकसोबत ग्रुप जॉईन करू शकतात. तसेच ग्रुप मेंबर्सचा फोन नंबर पाहू शकतात. याशिवाय, ग्रुप मेंबरच्या पोस्ट सुद्धा गुगलवर सर्च करून पाहिल्या जाऊ शकतात. व्हॉट्सअ‍ॅपने कधीपासून ग्रुप चॅट इनव्हाइटला गुगलवर इंडेक्स करणे सुरू केले आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. 

जवळपास 1500 ग्रुप इनव्हाइट लिंक सर्च रिझल्टमध्ये आधीच उपलब्ध आहेत. गुगलकडून इंडेक्स करण्यात आलेल्या काही ग्रुप युजर्संना पॉर्न कॉन्टॅक्टवर रिडायरेक्ट करत आहे. तर काही ग्रुप स्पेसिफिक युजर इंट्रेस्टचे आहेत. एक्सपर्टने फेसबुकची मालकी असलेलं इंस्टेंट मेसेंजर अ‍ॅप chat.whatsapp.com सबडोमेनसाठी robots.txt फाइलचा वापर करीत नाही. कंपनी सर्च क्रॉलर्सला कॉन्टेन्ट इंडेक्स करण्यापासून रोखण्यासाठी robots.txt चा वापर करते असं सांगितलं आहे

युजरचं प्रोफाईल पाहिल्यास गुगलने युजर्सचं प्रायव्हेट अकाउंट दाखवणं सुरू केलं आहे. यात युजर्सची प्रोफाईल इमेज आणि त्याच्या नावाचा समावेश आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या डोमेनवर कंट्री कोड टाकून युजर प्रोफाईल पाहू शकतात. रिपोर्टनुसार, जवळपास 5000 प्रोफाईल आता सार्वजनिक आहेत. राजहरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅप या ठिकाणी robots.txt फाईलचा वापर करत नाही. सध्या व्हॉट्सअ‍ॅप आणि गुगलने यासंबंधी कोणतीही माहिती दिलेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

नव्या पॉलिसीचा फटका! "या" देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी WhatsApp वर टाकला बहिष्कार; उचललं महत्त्वपूर्ण पाऊल

व्हॉट्सअ‍ॅपने काही दिवसांपूर्वी आपली नवी प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली आहे. ही नवी पॉलिसी आठ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचप तैयप एर्दोगन यांच्या प्रसारमाध्यमांसंदर्भातील विभागाने राष्ट्राध्यक्ष इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपचा प्लॅटफॉर्म सोडत असल्याची मोठी घोषणा केली आहे. तसेच तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयानेही यापुढे आपण व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या एका रिपोर्टनुसार राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांनी 11 जानेवारी रोजी आपले व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप इनस्क्रिप्टेड मेसेजिंग अ‍ॅप असणाऱ्या BiP वर ट्रान्सफर करण्याचे आदेश दिले. बीप हे तुर्कीमधील एक इनस्क्रिप्टेड अ‍ॅप आहे. अ‍ॅपची मालकी तुर्कसेल इलेटिसिम हिजमेटलेरी एएस या तुर्कीमधील कंपनीकडेच आहे. तुर्कीमध्ये आता या बीप अ‍ॅपवरुनच राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातून तसेच संरक्षण मंत्रालयासंदर्भातील सूचना दिल्या जाणार आहेत.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपgoogleगुगलtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल