UPI सर्व्हर डाऊन! गुगल पे, फोन पे वरून व्यवहार करताना ग्राहकांची मोठी अडचण; काय आहे तांत्रिक बिघाड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 20:11 IST2026-02-10T20:10:15+5:302026-02-10T20:11:27+5:30

युपीआय सेवेला मंगळवारी सायंकाळी मोठा फटका बसला आहे. देशभरातील अनेक युजर्सनी पेमेंट करताना व्यवहार अपयशी होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

UPI server down! Customers face major problem while transacting through Google Pay, Phone Pay; What is the technical glitch? | UPI सर्व्हर डाऊन! गुगल पे, फोन पे वरून व्यवहार करताना ग्राहकांची मोठी अडचण; काय आहे तांत्रिक बिघाड?

UPI सर्व्हर डाऊन! गुगल पे, फोन पे वरून व्यवहार करताना ग्राहकांची मोठी अडचण; काय आहे तांत्रिक बिघाड?

डिजिटल व्यवहारांचा कणा असलेल्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात युपीआय सेवेला मंगळवारी सायंकाळी मोठा फटका बसला आहे. देशभरातील अनेक युजर्सनी पेमेंट करताना व्यवहार अपयशी होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. ऐन गर्दीच्या वेळी सेवा विस्कळीत झाल्याने दुकानदारांपासून ते ग्राहकांपर्यंत सर्वांचीच मोठी तारांबळ उडाली आहे.

'डाऊनडिटेक्टर'वर तक्रारींचा पाऊस

आउटेज-ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म 'डाऊनडिटेक्टर'नुसार, मंगळवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास युपीआय सेवेबाबतच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुमारे ५७७ युजर्सनी सेवा विस्कळीत झाल्याचे अहवाल दिले होते. यामध्ये एकट्या 'गुगल पे' संदर्भात १४१ तक्रारींची नोंद ७:०७ वाजेपर्यंत झाली होती. अनेक इतर पेमेंट ॲप्सवरून पैसे पाठवताना तांत्रिक त्रुटी येत असल्याचे युजर्सनी सोशल मीडियावर सांगितले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाची महत्त्वाची सूचना

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, नियोजित देखभालीच्या कामामुळे युपीआय सेवा काही काळ बंद राहणार आहे.

बँकेने 'एक्स'वर दिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "नियोजित देखभाल कार्यामुळे, SBI UPI सेवा दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ०२:०० ते ०२:४५ या वेळेत तात्पुरती अनुपलब्ध असेल. ग्राहकांनी अखंड सेवेसाठी 'UPI Lite'चा वापर सुरू ठेवावा. ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत."

ग्राहकांनी काय करावे?

जर तुमचे यूपीआय व्यवहार वारंवार फेल होत असतील, तर 'हे' पर्याय वापरून पाहू शकता:

युपीआय लाईट: लहान रक्कमेच्या व्यवहारांसाठी युपीआय लाईटचा वापर करा, जे पिनशिवाय आणि बँक सर्व्हरवर कमी ताण देऊन चालते.

नेट बँकिंग: तातडीचे मोठे व्यवहार करायचे असल्यास बँकेचे अधिकृत ॲप किंवा नेट बँकिंग वापरा.

कॅश/कार्ड: तांत्रिक बिघाड पूर्णपणे दूर होईपर्यंत सोबत रोख रक्कम किंवा डेबिट/क्रेडिट कार्ड ठेवणे सोयीचे ठरेल.

Web Title : यूपीआई सर्वर डाउन: गूगल पे, फोन पे यूजर्स को लेन-देन में दिक्कत

Web Summary : यूपीआई सेवाओं में व्यवधान के कारण कई उपयोगकर्ताओं को लेनदेन में विफलता का सामना करना पड़ा। एसबीआई ने रखरखाव की घोषणा की, यूपीआई लाइट को विकल्प बताया। उपयोगकर्ताओं को नेट बैंकिंग या नकदी का उपयोग करने की सलाह दी गई है।

Web Title : UPI Server Down: Google Pay, PhonePe Users Face Transaction Issues

Web Summary : UPI services faced disruptions, causing transaction failures for many users. SBI announced maintenance, suggesting UPI Lite as an alternative. Users are advised to use net banking or cash.

टॅग्स :bankबँक