नेटवर्क नसतानाही होणार UPI पेमेंट! आता खिशात कॅश ठेवण्याची कटकट संपली; जाणून घ्या 'ही' भन्नाट ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 12:54 IST2026-03-22T12:54:01+5:302026-03-22T12:54:47+5:30

तुम्हाला माहीत आहे का? इंटरनेट किंवा वाय-फाय नसतानाही तुम्ही चुटकीसरशी कोणालाही पैसे पाठवू शकता.

UPI payments will be made even without a network! Now the hassle of keeping cash in your pocket is over; Know 'this' amazing trick | नेटवर्क नसतानाही होणार UPI पेमेंट! आता खिशात कॅश ठेवण्याची कटकट संपली; जाणून घ्या 'ही' भन्नाट ट्रिक

नेटवर्क नसतानाही होणार UPI पेमेंट! आता खिशात कॅश ठेवण्याची कटकट संपली; जाणून घ्या 'ही' भन्नाट ट्रिक

आजच्या काळात भाजीवाल्यापासून ते मोठ्या शोरूमपर्यंत प्रत्येक ठिकाणी आपण 'यूपीआय'द्वारे पैसे देतो. ऑनलाइन पेमेंटमुळे खिशात रोख रक्कम बाळगण्याची गरज उरलेली नाही. मात्र, अनेकदा दुर्गम भागात किंवा प्रवासादरम्यान मोबाईलमध्ये इंटरनेट नसतं आणि अशा वेळी पेमेंट कसं करायचं, हा मोठा प्रश्न निर्माण होतो. पण तुम्हाला माहीत आहे का? इंटरनेट किंवा वाय-फाय नसतानाही तुम्ही चुटकीसरशी कोणालाही पैसे पाठवू शकता. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यासाठी एक विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

२०२२ मध्ये आली ही सुविधा

शहरांमध्ये इंटरनेटची समस्या जाणवत नाही, पण ग्रामीण भागात किंवा लिफ्टमध्ये असताना रेंज गेल्यावर आपण अडकून पडतो. हीच अडचण ओळखून NPCIने २०२२ मध्ये विना इंटरनेट युपीआय पेमेंटची सुविधा सुरू केली होती. हे फिचर मोबाईल डेटाऐवजी युएसएसडी कोडवर आधारित आहे. म्हणजेच, तुमच्याकडे साधा साधा फोन (फीचर फोन) असला तरीही तुम्ही याचा वापर करू शकता.

कसे कराल विना इंटरनेट पेमेंट?

विना इंटरनेट पैसे पाठवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे:

१. तुमच्या मोबाईलच्या डायल पॅडवरून *99# हा कोड डायल करा.
२. थोड्याच वेळात तुमच्या स्क्रीनवर एक मेनू दिसेल.
३. त्यामध्ये पैसे पाठवण्यासाठी "Send Money" असलेला पर्याय निवडा.
४. आता तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा मोबाईल नंबर किंवा युपीआय आयडी टाकण्यास सांगितले जाईल.
५. मोबाईल नंबर टाकल्यानंतर समोरच्या व्यक्तीचे नाव स्क्रीनवर येईल, ते तपासून घ्या.
६. आता तुम्हाला जेवढी रक्कम पाठवायची आहे, ती टाका आणि तुमचा युपीआय पिन टाका.
७. बस! तुमचे पैसे यशस्वीरित्या ट्रान्सफर होतील.

वापरण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

ही सुविधा वापरण्यासाठी काही अटी आहेत, ज्या पाळणे गरजेचे आहे:

- तुमचा मोबाईल नंबर बँकेशी लिंक असणे अनिवार्य आहे.

- तुमच्या सिम कार्डमध्ये बॅलन्स असणे आवश्यक आहे (कारण हा एक USSD संदेश असतो).

- काही बँकांमध्ये यासाठी आधार कार्ड लिंक असणेही गरजेचे असू शकते.

आता पुढच्या वेळी इंटरनेट नसेल आणि पेमेंट करायचे असेल, तर घाबरून जाऊ नका. फक्त *99# डायल करा आणि तुमचे काम फत्ते करा!

Web Title : बिना इंटरनेट UPI भुगतान: कैशलेस लेनदेन के लिए एक सरल तरीका

Web Summary : अब, बिना इंटरनेट के भी UPI भुगतान संभव है! आसानी से पैसे भेजने के लिए अपने फोन पर *99# कोड का उपयोग करें। यह सुविधा, जिसे NPCI ने 2022 में पेश किया था, फीचर फोन पर भी काम करती है। सुनिश्चित करें कि आपका नंबर आपके बैंक खाते से जुड़ा हुआ है।

Web Title : UPI Payments Without Internet: A Simple Trick for Cashless Transactions

Web Summary : Now, UPI payments are possible even without internet! Use the *99# code on your phone to send money easily. This feature, introduced by NPCI in 2022, works on feature phones too. Ensure your number is linked to your bank account.